Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: उन्हाळ्यात दिवसभर सॉक्स घालताय? एकदा 'हे' होणारे परिणाम जाणून घ्या...

Health Tips: पायातून येणारा घाम मोज्यांमध्ये मुरतो.

Ganeshprasad Gogate

Health Tips: उन्हाळा सुरू झाला की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. उन्हाळ्यात सतत मोजे म्हणजे सॉक्स घालून राहणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.

अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात. हेही चुकीचे आहे. पायांने हवेशीर ठेवण्यासाठी रात्री मोजे वापरणे टाळा. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मोजे वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात...

  • रक्त संचार प्रभावित होणे...

शरीराच्या प्रत्येक अंगाला रक्ताची गरज असते. घट्ट मोजे घातल्याने पायांच्या नसा दबल्या जातात. त्या दबलेल्या नसांमध्ये योग्यप्रकारे रक्त संचार होत नाही.

याकारणाने पूर्ण शरीरातील रक्त संचार प्रभावित होतो. यामुळे पायांचा त्रास वाढतो. पाय दुखायला लागतात.

  • एडीमा होऊ शकतो...

शरीरातील एखाद्या भागात तरल पदार्थ जमा होणे आणि त्या जागेवर सूज येणे हे एडीमाचे लक्षण आहे. ही सूज हळूहळू वाढू लागते. यामुळे पाय सुन्न होतात.

ही बाब फार गंभीर आहे. वेळीच डॉक्टरांची सल्ला न घेतल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो.

  • फंगल इन्फेक्शनचा धोका...

पायातून येणारा घाम मोज्यांमध्ये मुरतो. पण जास्तवेळ मोजे तसेच घालून ठेवल्याने मोज्यामधील घाम पूर्णपणे कोरडा होत नाही. त्या मोज्यांमध्ये ओलावा असल्याने त्यात बॅक्टेरिया आणि विषाणू होतात. याच कारणाने फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.

  • अशी घ्या काळजी...

डॉक्टर लहान मुलांना नेहमीच जरा मोठे मोजे घेण्याचा सल्ला देतात. सिंथेटीकचे मोजे वापरण्यापेक्षा सूती कापडाचे मोजे वापरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT