"कामाशिवाय स्वतः कडे लक्ष द्यायला जमत नसेल तर काम दे सोडून" तुमची आई पण अशीच काळजी करते आणि तुम्हाला ही काळजी समजत असली तरीही पुरेसा वेळ नसेल तर काय करावं? तुम्हाला तुमच्या आरोग्याची अतिशय काळजी वाटतेय का? कामाच्या ताणात आणि स्पर्धात्मक युगात काहीसा वेळ बाजूला काढावा आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असं वाटतायत मात्र अगदी सोप्या पद्धतीने हे कसं करावं समजत नाहीये का? काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सुचवणार आहोत जेणेकरून तुमचा जास्ती वेळ खर्च होणार नाही आणि सोबतच तुम्ही स्वतःची काळजी देखील घ्याल.
कामाच्या नादात अनेकवेळा आपण वेळेवर जेवण करायला विसरतो. हा एवढा टास्क संपवून जावं या विचारात कामं अंगावर येत राहतात आणि जेवण मागे राहतं. असं करत असाल तर वेळीच ते थांबवा. तुमच्या आरोग्यासाठी रोजरोज भूक मारणं बरोबर नाही.
आतड्या अन्नासाठी प्रयत्न करतात आणि पोटाचे आजार निर्माण होऊ शकतात, म्हणूनच वेळच्यावेळी खा. जेवणाच्या वेळा शक्यतो चुकवू नका. अधूनमधून भूक लागल्यास आपण पाणी पिऊन ती शमवण्याचा प्रयत्न करतो, मात्र असं न करता सोबत काही तरी खायला ठेवा. यात फळं, सुकामेवा यांचा समावेश होतो.
लक्ष्यात ठेवा अन्नासोबत पाणी सुद्धा तेवढंच महत्वचं आहे. पाण्यामुळे सतत ऊर्जा मिळते, सांधेसूखी कमी होते, पचनक्रिया सुधारते. कामाला जात असताना सोबत एक पाण्याची बाटली ठेवा आणि वेळच्यावेळी पाणी प्या.
कामामुळे आपण अनेकवेळा एकाच जागेवर खूप वेळ बसून असतो.यामुळे शरीर अडकू शकतं, म्हणूनच कामातून वेळ काढत चालून या. सकाळी किंवा संध्याकाळी नियमित व्यायाम करा. यामुळे हाडांना बळ मिळेल, झोप नीट लागेल, मनावरचा ताण हलका व्हायला मदत मिळेल. वेळोवेळी कंटाळा येणार नाही, किंवा कामाचा उत्साह वाढेल. घरी गेल्येगेल्या पुन्हा मोबाईलमध्ये डोकावून बसण्यापेक्षा शरीराला मदत करेल अशा गोष्टी करा,यामुळे ताजं तवानं रहायला मदत मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.