Vitamin C Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vitamin C Benefits : उन्हाळ्यात नितळ त्वचेसाठी विटामीन सी अतिशय फायदेशीर; वाचा सविस्तर

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

दैनिक गोमन्तक

Vitamin C Benefits : आधुनिक काळात निरोगी राहणे आव्हानापेक्षा कमी नाही. यासाठी संतुलित आहार घ्या आणि रोज व्यायाम करा. समतोल आहारात सर्व आवश्यक पोषक घटक आढळतात. यापैकी कोणत्याही एका पोषक तत्वाच्या कमतरतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याशिवाय त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. संत्री, आवळा, पेरू, शिमला मिरची, चिंच इत्यादी गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. जाणून घेऊया त्याचे फायदे

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन-सी समृद्ध अन्न समाविष्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन-सी युक्त अन्न जरूर खा.

  • त्वचा नितळ बनते

व्हिटॅमिन सी युक्त अन्न खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. तसेच त्वचा गुळगुळीत करते. चेहऱ्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते.

  • हायपरपिग्मेंटेशनमध्ये आराम मिळतो 

हायपरपिग्मेंटेशनचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काळे डाग पडू लागतात. यासोबतच त्वचेचा रंग काही ठिकाणी काळा होऊ लागतो. जर तुम्हीही हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येने त्रस्त असाल, तर आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा अवश्य समावेश करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! मूर्ती स्थापनेचे नियम आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

"मी चर्चमध्ये जाणं सोडलं; माझा हरवलेला सन्मान कोण परत देणार?" निर्दोष सुटल्यानंतर माविन नेमकं काय म्हणाले?

Margaon: खुल्या जागेत मासेविक्री नको, आरोग्य केंद्राकडून पालिकेला निर्देश; मोकळ्या जागेचा होतोय गैरवापर

SCROLL FOR NEXT