Pomegranate Juice Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pomegranate Juice Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस प्यायल्याने 'हे' आजार होतील दूर!

Pomegranate Juice Benefits : सकाळी डाळिंबाचा रस प्यायल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.

दैनिक गोमन्तक

Pomegranate Juice Benefits : निरोगी शरीरासाठी फळे आणि त्यांचा रस यांचा आहारात नक्कीच समावेश करा. सध्या डाळिंबाचा हंगाम आहे, अशा स्थितीत तुम्ही दररोज डाळिंबाचा रस पिऊ शकता. हे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल, पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.

सकाळी डाळिंबाचा रस प्यायल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि हिमोग्लोबिन वाढते. व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, ओमेगा 6 फॅटी ऍसिडस्, फायबर आणि प्रोटीन देखील डाळिंबाच्या रसात आढळतात. या सर्व पोषक घटकांमुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिण्याचे काय फायदे आहेत.

(Pomegranate Juice Benefits)

रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिण्याचे फायदे

1. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल आणि तुम्ही अॅनिमियाचे शिकार असाल तर तुम्ही डाळिंबाचा रस जरूर प्या. रोज रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते. त्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढतात आणि अशक्तपणाची तक्रार दूर होते.

2. रोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. डाळिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर आजारांपासून दूर राहते.

3. चेहरा चमकेल- डाळिंबाचा रस त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. रोज डाळिंबाचा रस प्यायल्याने त्वचा चमकू लागते. डाळिंबात अँटी-ऑक्सिडंट घटक असतात ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकते.

4. गरोदरपणात अनेकदा महिलांच्या शरीरात जीवनसत्त्वे आणि लोहाची कमतरता असते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी डाळिंबाचा रस जरूर प्यावा. यामुळे शरीरातील जीवनसत्त्वे आणि लोहाची कमतरता पूर्ण होते. शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते आणि ऊर्जाही मिळते.

5. दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने हृदय निरोगी राहते. डाळिंबात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. विशेषतः डाळिंबाचा रस रिकाम्या पोटी पिणे खूप फायदेशीर आहे.

6. डाळिंबात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने डाळिंबाचा रस जरूर प्यावा. रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT