Healthy Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

वयाच्या चाळीशीनंतर झोप कमी का होते, जाणून घ्या

वयाच्या चाळीशीनंतर अनेक लोकांना पुरेशी झोप येत नाही.

दैनिक गोमन्तक

अनेकांना वाढत्या वयाबरोबर अनेक समस्याना सामोरे जावे लागते. पण यामध्ये अनेकांना कमी झोपेची समस्या असते. अनेक समस्यावर लोक बोलतात पण या समस्येवर कोणी चर्चा करत नाही. ही समस्या चाळीशीनंतर उद्भवते. पण या समस्येवर कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊया.

एक संशोधनात असे दिसून आले की 30 ते 60 वयोगटामधील महिला (Women) सात तासांपेक्षा कमी झोपतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना झोपेच्या समस्या अधिक असतात. महिलांना झोप (Sleep) कमी येण्यामागे कारण म्हणजे मानसिक ताण आणि शारीरीक बदल हे आहे.

* या उपायांचा करा वापर

* कोमट आंघोळ करा

चांगली झोप येण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होऊन थकवा जाणवतो. यामुळे तुम्हाला झोप लागण्यास मदत मिळते.

* स्वत:ला शांत ठेवा

झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाइल (Mobile) पाहणे टाळावे. यामुळे तुम्हाला पुरेशी झोप येण्यास मदत मिळेल. तसेच चांगली झोप येण्याकरिता चांगली पुस्तके वाचू शकता आणि गाणी ऐकू शकता.

* योगा करावा

योग (Yoga) करणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असते. योगा केल्याने तणाव आणि चिंता दूर राहते. साधा आणि सोपा योगा केल्याने झोप येण्यास मदत मिळते. तुम्हाला झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज पडत नाही.

* चहा, कॉफी सेवन कमी करावे

वाढत्या वयाबरोबर आपल्या सवयीमध्ये सुद्धा बदल करणे आवश्यक आहे. या पेयाचे सेवन मर्यादित केल्याने तुम्हाला चांगली झोपही येऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी घेणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT