Health Care Tips in Summer  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Health Care : सतत थकवा जाणवतोय? मग या गोष्टी घ्या जाणून

उन्हाळ्यात अनेकांना सतत झोप येणे, थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवतात.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात अनेकांना सतत झोप येणे, थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवतात. एक वेळ अशी येते की तुम्ही कितीही सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला तरी, परंतु तुमचे शरीर सहकार्य करत नाही आणि यापुढे काम करणार नाही असे सतत वाटते. ऑफिसला जायला लागल्यावर हा त्रास वाढतो. थकवा इतका जाणवू लागतो की अनेकांना काम पूर्णपणे करता येत नाही.

उन्हाळ्यात, खांदे वाकणे, डोळ्यांच्या समस्या, जास्त घाम येणे, थकवा जाणवणे या सर्व सामान्य गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही खाली दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता.

उन्हाळ्यात सतत झोप येण्याचे कारण :

उन्हाळ्यात आपले शरीर थंड राहण्यासाठी खूप मेहनत घेते. शरीरात रक्तवाहिन्या किंचित पसरणे, घाम येण्याची प्रक्रिया आणि व्हायोडायलेशन. ज्यामुळे लोक उन्हात लाल दिसू लागतात. या सगळ्यामुळे शरीरातील ऊर्जा निघून जाते. हृदयाचे ठोकेही वाढतात आणि त्यामुळे सतत झोप येते.

जास्त वेळ उन्हात राहू नका :

सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते आणि मेलाटोनिन हे शरीरातील मूड नियंत्रित करणारे अत्यंत महत्त्वाचे हार्मोन आहे. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात राहिल्यास तुम्हाला भोवळ येऊ शकते. तुमचे शरीर थंड होण्यासाठी खूप उर्जेची मागणी करते. जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना उन्हात जाणे टाळता येत असेल तर तेच करा.

कॅफिनपासून दूर राहा :

कधी कधी लोक खूप जास्त कॉफी घेतात. त्यांना वाटते की जास्त कॉफी प्यायल्याने त्यांना जास्त एनर्जी मिळेल, असे केल्यास रात्रीच्या झोपेवर परिणाम होईल आणि त्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होणार नाही.

अल्कोहोलचे सेवन कमी करा : जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्य सेवन करत असाल तर असे करू नका. अल्कोहोल आणि निकोटीनचा तुमच्यावर चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे शरीरात थकवाही येतो. नियमित दारूचे सेवन करत राहिल्यास या काळात उन्हाळ्यात त्रास होतो. शरीराचे तापमान अधिक वाढते आणि त्याच वेळी तुम्हाला अधिक त्रास होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

Claudia Konkani Film: इंडियन पॅनोरमामध्ये ‘क्लावदिया’ला स्‍थान, कोकणी चित्रपटाचा सन्‍मान; 27 रोजी होणार प्रदर्शन

Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT