Alcohol Side Effects For Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Alcohol Side Effects : दारूच्या सवयीने आयुष्य होते उद्ध्वस्त! जाणून घ्या हे व्यसन कसे सोडवायचे

Alcohol Side Effects For Health : दारू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

दैनिक गोमन्तक

दारू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अल्कोहोलचा हृदय आणि यकृतावर वाईट परिणाम होतो. मद्यपान केल्याने शरीराच्या प्रत्येक भागावर हळूहळू परिणाम होतो. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जास्त मद्यपान केल्याने शरीरात निर्जलीकरण होते.

लोकांना दारूचे तोटे कळल्यानंतरही व्यसन सोडणे सोपे नाही. तथापि, काही घरगुती उपाय तुम्हाला दारूचे व्यसन सोडण्यास मदत करू शकतात. जाणून घ्या दारूचे तोटे आणि दारूचे व्यसन कसे सोडवायचे.

(Alcohol Side Effects For Health)

अल्कोहोलचे दुष्परिणाम

  • मानसिक आजाराचा धोका वाढतो

  • अल्कोहोलचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो

  • दारू पिल्याने यकृत खराब होते

  • दारू पिल्याने डिहायड्रेशन आणि पोटाचे आजार होतात

  • जास्त मद्यपानामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो

  • दारूच्या व्यसनामुळे कर्करोगही होऊ शकतो

  • मद्यपान केल्याने यकृताचा सिरोसिस होऊ शकतो

Alcohol

दारूच्या व्यसनापासून मुक्त कसे व्हावे ?

  • मनुका : दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी मनुका खा. जर तुम्हाला दारू प्यावेसे वाटत असेल तर अशा वेळी मनुके खाऊ शकता. 4-5 मनुके खाल्ल्याने दारू पिण्याची इच्छा कमी होईल आणि व्यसनापासून मुक्त होण्यास मदत होईल.

  • खजूर : दारू पिण्याचे व्यसन सोडवण्यासाठी खजूरचा वापर करू शकता. दारूचे व्यसन सोडण्यासाठी खजूरचे पाणी पिण्याची शिफारस केली जाते. यासाठी खजूर किसून पाण्यात मिसळा. हे पाणी दिवसातून 2-3 वेळा प्या.

  • गाजराचा रस : दारू सोडण्यासाठी गाजराचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. दारूचे व्यसन सोडण्यास मदत होते. तुम्ही सफरचंदाचा रस देखील पिऊ शकता. सफरचंदाचा रस दिवसातून 2-3 वेळा प्यायल्याने दारूचे व्यसन सुटण्यास मदत होईल.

  • तुळशीची पाने : तुळशी हे आयुर्वेदिक औषध आहे. दारूचे व्यसन सोडण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करा. यामुळे दारू पिण्याची तीव्र इच्छा कमी होते. तुळशीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट घटक आढळतात. ज्यामुळे बॉडी डिटॉक्स देखील होते.

  • अश्वगंधा : दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठीही अश्वगंधा वापरली जाते. रोज एक चमचा अश्वगंधा पावडर दुधात मिसळून मद्यपानाची सवय सुटू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT