Benefits of Papaya in Winter Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Papaya in Winter: बाजारात भरपूर पपई मिळतेय; पण थंडीच्या दिवसांत हे फळ खावं की नाही?

Benefits of Papaya in Winter: या फळामध्ये काही विटामिन आणि मिरल्स असतात जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत

Akshata Chhatre

थंडीच्या दिवसांत भरपूर प्रमाणात पपई बाजारात उपलब्ध होते, पण बाजारात आहे म्हणून आपण पपई विकत घ्यावी का? थंडीच्या दिवसांत पपई खावी का? की आपल्याकडून खूप मोठी चूक होतेय? एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या काळात जे फळ तुमच्यासाठी लाभदायक आहे तेच निसर्ग निर्माण करत असतो त्यामुळे पपई थंडीच्या दिवसांत खाल्ल्याने काहीही त्रास होणार नाही. या फळामध्ये काही विटामिन आणि मिरल्स असतात जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत.

पपई खाल्ल्याने शरीरात उष्णता तयार व्हायला मदत मिळते, पपई हे मुळातच उष्ण फळ आहे त्यामुळे थंडीच्या दिवसांत तुम्ही नक्कीच पपई खाल्ल्याने फायदा मिळेल.

पपईमुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत मिळते तसेच लिव्हरचं आयुष्य देखील वाढतं. तुमच्या शरीरातील न पचलेल्या पदार्थांना शरीराच्या बाहेर पडायला पपई मदत करते आणि म्हणूनच थंडीच्या काळात नक्कीच पपई खावी असं म्हटलं जातं.

तुम्हाला अस्थमा सारख्या रोगांचा त्रास होत असेल तर नक्कीच पपई खा, कारण पपईमुळे आतड्यांना आलेली सूज कमी होते आणि परिणामी अस्थमाचा त्रास होत नाही. रूमेटॉइड आर्थराइटिस किंवा ऑस्टियोआर्थराइटिस सारखे आजार असल्यास नक्कीच पपई खावी कारण पपईमुळे हाडांना पोषण मिळायला मदत होते. तुमच्या शरीराला पपई अनेक प्रकारे मदत करणारा घटक आहे त्यामुळे किमान दिवसांतून एक फळ खाण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये पपई देखील सामील करायला घाबरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

SCROLL FOR NEXT