Caves of Khandepar Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Caves of Khandepar: गोव्यातील ही प्रसिध्द लेणी कधी पाहिली आहेत का?

Caves of Khandepar: खांडेपार लेणी पणजीपासून 36 किलोमीटर अंतरावर फोंडा तालुक्यातील खांडेपार गावात आहेत.

Shreya Dewalkar

Caves of Khandepar

खांडेपार येथील ही लेणी खांडेपार गावाजवळील जंगलात सुमारे 10 व्या किंवा 11 व्या शतकातील आहेत, हा साधारणपणे संरचनात्मक मंदिरांचा काळ होता. उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा येथील खांडेपार येथे या लेणी स्थित आहेत, या लेण्या मांडवी नदीच्या स्थानिक उपनदीपासून सुमारे 50 मीटर अंतरावर असलेल्या एका टेकडीमध्ये कोरल्या गेल्या आहेत. या लेण्यांचा शोध अंदाजे 1970 मध्ये लागला आहे

खांडेपार लेण्यांचे शिल्प

एकाच याठिकाणी चार गुहा आहेत, सर्व गुहा दिसायला सारख्या आहेत आणि मंदिराच्या शिखराच्या रूपात बांधलेल्या आहेत. या लेणी मुख्य संरचनेच्या वरच्या बाजूला आहेत. या गोव्यातील सर्वोत्तम लेणी आहेत. लेण्यांच्या आतील आणि बाहेरील कोरीवकाम उत्कृष्टपणे केले आहेत.

गुहेच्या बाहेरील छतावर कमळाच्या आकाराची सजावट देखील दिसते जी समकालीन मंदिर संरचनांचे अनुकरण दर्शवते. याठिकाणी एकल कोष असलेली चौथी गुहा फारशी सुशोभित नाही हा गुहा बहुधा संकुलाचे मंदिर किंवा ध्यान कक्ष बनवलेली असावी.

खडक कापलेले देखावे बौद्ध उत्पत्तीची भावना देतात आणि सापडलेले काही शिलालेख देखील या विचाराचे समर्थन करतात. तथापि, शिखराची रचना आणि कंदील-शैलीतील छताचा वापर असल्यामुळे हिंदू मंदिराची शक्यता देखील नाकारता येत नाही.

खांडेपार लेण्यांना अशी द्या भेट

खांडेपार लेणी पणजीपासून 36 किलोमीटर अंतरावर फोंडा तालुक्यातील खांडेपार गावात आहेत. 4 लेणी जवळच्या परिसरात आहेत, पहिली आणि दुसरी जवळजवळ जोडलेली आहे, तिसरी फक्त एक मीटर अंतरावर आहे आणि चौथी पहिल्या गुहेच्या विरुद्ध आहे. खांडेपार गाव NH4 वर फोंड्याच्या उत्तर-पूर्वेला 5 किमी अंतरावर आहे. फोंडा येथे रेल्वे स्टेशन नाही, याठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन हे मडगाव आहे, फोंडापासून जवळपास 14 किमी अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

SCROLL FOR NEXT