New Year 2024  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हॅप्पी न्यू ईयर! नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चर्च, मंदिर, गुरूद्वारात अलोट गर्दी, पाहा Video

देशभरात नव वर्षानिमित्त नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वर्षाचा पहिला दिवस खास करण्यासाठी नागरिकांनी मंदिर, मस्जिद आणि चर्चेमध्ये गर्दी केल्याने भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

Puja Bonkile

New Year 2024: देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागतं करण्यात येत आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. देशभरात नागरिकांनी फटाक्यांची आतीषबाजी करून 2024 चे स्वागत केले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, लोक वर्षाचा पहिला दिवस खास करण्यासाठी मंदिर, मस्जिद आणि चर्चेमध्ये गर्दी करत असल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने शेअर केला आहे.

दिल्लीच्या झंडेवालान देवी मंदिरात नवीन वर्षानिमित्त आरती करण्यात आली.

तामिळनाडू येथे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रामेश्वरममधील चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आल्या.

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने नववर्षानिमित्त भगवान तिरुपती बालाजीचे मंदिर सुंदर फुलांनी सजवले आहे. मंदिररची सजावट पाहण्यासारखी आहे.

अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरातही वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी देवासमोर नतमस्तक होऊन त्याला शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेशमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी नदी किनारी पुजाकरण्यात आली . हे नयनरम्य दृश्य हजारो भाविकांनी पाहिले.

नवीन वर्षानिमित्त मीनाक्षी अम्मान मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.

तामिळनाडूतील वेलंकन्नी चर्चमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी तिरुवल्लूर येथील तिरुट्टानी अरुल्मिगु सुब्रमण्यस्वामी मंदिरात विशेष महाआरती करण्यात आली.

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी गीर सोमनाथ येथील सोमनाथ मंदिरात विशेष आरती करण्यात आली.

अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरातही वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी देवासमोर नतमस्तक होऊन त्याला शुभेच्छा दिल्या. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांनी नवीन वर्षाची सुरुवात होताच सुवर्ण मंदिरात प्रार्थना केली.

केरळमधील सन्निधानम सबरीमाला मंदिर पुन्हा उघडल्यावर नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: गुन्हे शाखेच्या कार्यालयात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; पोलिस निरीक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई

ST Reservation: एसटी आरक्षणाचा पेच सुटणार? गोवा सरकार 2013 च्या अधिसूचनेचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणार

VIDEO: बापरे, हे तर पैशांचं घबाड! जमिनीखाली पुरलेल्या तीन ड्रममधून तब्बल 3 कोटी 20 लाखांची रोकड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

Horoscope: नोव्हेंबरचा पहिला दिवस ठरणार खास! मेष-धनु राशींना मिळणार आनंदाची बातमी, तुळ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची घ्यावी काळजी

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT