Happy Marriage Life Tips: प्रत्येक नातं टिकून राहण्यासाठी त्यात विश्वास आणि प्रेम असणे गरजेचे असते.जर पती-पत्नीमध्ये वाद होत असेल वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम तुम्ही फॉलो करू शकता. यामुळे नात्यात गोडवा वाढेल आणि तणाव कमी होईल. यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
बेडरूमची जागा
मास्टर बेडरूम घराच्या नैऋत्य कोपऱ्यात असणे वास्तुनुसार शुभ मानले जाते. ही दिशा जोडप्यांमधील जवळीक आणि समजूतदारपणा वाढवते असे मानले जाते. बेड दक्षिण-पश्चिम भिंतीकडे तोंड करून ठेवावा.
फॅमिली फोटो
तुमच्या घरात फॅमिली फोटो लावू शकता. हा फोटो सकारात्मकतेला प्रोत्साहन देऊ शकतो आणि तुम्ही शेअर करत असलेल्या प्रेमाची आणि बंधनाची आठवण करून देऊ शकतात.
सुखदायक रंग वापरा
बेडरूममध्ये गुलाबी, हिरवा किंवा निळा या रंगाचे लाइट शेड्स देऊ शकता. हे रंग शांतता वाढवतात आणि पती-पत्नीमधील तणाव कमी करतात.
समस्यांवर उपाय शोधावे
तुमच्या घरात सकारात्मक उर्जा विनाअडथळा वाहू देण्यासाठी समस्यांवर उपाय शोधावे. एकमेकांना दोष देणे टाळावे. यामुळे नात्यात गोडवा वाढेल आणि तुमची प्रगती होईल.
संतुलित घटक
तुमच्या घरातील पाच तत्वांना संतुलित करावे. निरोगी वातावरण तयार करण्यासाठी घरात खेळती हवा आणि सुर्यप्रकाश येणे गरजेचे आहे. अति उष्णतेचे स्त्रोत किंवा पाण्याचे घटक टाळा ज्यामुळे घर्षण होऊ शकते.
घरात स्वच्छ ठेवावे
घरात अस्वच्छता असेल तर तणाव निर्माण करू शकते. तुमच्या नात्यात सकारात्मकता वाढवण्यासाठी घरात स्वच्छता आणि आनंदी वातावरण ठेवावे.
वरील वास्तू टिप्स फॉलो करून तुम्ही असे वातावरण तयार करू शकता जे समजून घेण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच संघर्ष कमी करून पती-पत्नीमधील गोडवा वाढवेल. पण हेल्दी आणि आनंदी वैवाहिक जीवन टिकवण्यासाठी उत्तम संवाद आणि परस्पर आदर तितकेच आवश्यक आहेत.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.