Happy Life Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy Life Tips: पैसा, करिअर, उत्तम आरोग्यासोबत प्रेमळ नातेसंबंधही तुमचं आयुष्य वाढवतात

Tips For Happy Life: सुखी आणि दिर्घायुष्यासाठी फक्त पैसा, पोषक आहार किंवा पॉवरसह प्रेमळ नातेसंबंध असणे देखील खुप महत्वाचे आहे असे एका संशोधनात समोर आले आहे.

Puja Bonkile

Tips For Happy Life: सुखी आणि दिर्घायुष्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात. जर तुमचे मन आनंदी असेल तर तुम्हाला जग सुंदर वाटते पण मन दु:खी असेल तर आयुष्य एक ओझ असल्यासारखे वाटू लागते.

अनेक लोकांचे असे मत आहे की सुखी आयुष्यासाठी पैसा, पॉवर,करिअर, उत्तम आरोग्य असणे गरजेचे आहे.

पण असे नसून हार्वर्डच्या संशोधकांच्या मते सुखी आयुष्यासाठी प्रेमळ नातेसंबंध असणे देखील महत्वाचे आहे.

  • संशोधन काय सांगतं

हार्वर्डच्या संशोधकांनी १९३८ मध्ये असे संशोधन सुरू केले ज्यामध्ये त्यांना हे जाणून घ्यायचे होते की सुखी आयुष्यासाठी काय गरजेचे आहे.

यासाठी त्यांनी संपुर्ण जगातील ७२४ लोकांचे संशोधन करून त्यांच्या हेल्थ रेकॉर्डचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना मोठी माहिती मिळाली.

सुखी आणि दिर्घायुष्यासाठी केवळ पैसा, करिअर, यश, उत्तम आरोग्यच गरजेचे नसून प्रेमळ नातेसंबंध असणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. असे ८५ वर्ष चाललेल्या संशोधनात समोर आले आहे.

  • प्रेमळ नातेसंबंध सुखी आणि दिर्घायुष्यासाठी गरजेचे

यापुर्वी अनेक संशोधनात असे समोर आले की, ब्रेकअपनंतर लोकांचे मन दु:खी होते. त्यांचे कोणत्याच कामात मन लागत नाही. याचा वाईट परिणाम त्यांच्या शरिरावर देखील होतो.

उलट आपले नातेसंबंध चांगले असेल तर प्रत्येक काम यशस्वीरित्या पुर्ण करतो. हे नाते आयुष्यात सपोर्ट सिस्टीमसारखे काम करतात. यामुळे प्रेमळ नातेसंबंध जेवढे चांगले तेवढे आपले आयुष्य सुखी बनते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT