Happy Birthday Kareena Kapoor: सौंदर्य मेंटेन ठेवण्यासाठी बेबो वापरते बेबी ऑइल  Instagram/@kareenakapoorkhan
लाइफस्टाइल

Happy Birthday Kareena Kapoor: सौंदर्य मेंटेन ठेवण्यासाठी बेबो वापरते बेबी ऑइल

दैनिक गोमन्तक

करीना कपूर खान ( Kareena Kapoor Khan) एक अशी बॉलीवुड अभिनेत्री आहे जीच्यावर सगळे खूप प्रेम करतात. फक्त तिचा अभिनयच नाही तर करीनाच्या सौंदर्याचेही लाखो चाहते आहेत. ती मेकअपशिवाय सुद्धा खूप सुंदर दिसते. तिने अनेक चित्रपटांमध्ये मेकअपशिवाय काम केले आहे आणि आपण असे म्हणू शकतो की तिची त्वचा नितळ आहे . बेबोच्या त्वचेचा, विशेषता: महिलांना अधिक हेवा वाटतो कारण ती सुंदर असण्याबरोबरच नैसर्गिकरित्या ग्लोइंग आहे. करीना कपूर त्वचेसाठी महागडे उपचार करत नाही किंवा चेहऱ्यावर विशेष असे कोणते सौंदर्य उत्पादनसुद्धा लावत नाही. पण काही सोप्या टिप्स वापरुन तिची त्वचा नितळ आणि सुंदर दिसते. चला तर मग जाणून घेवूया काय आहेत तिच्या ब्युटी टिप्स.

* मॉश्‍चराइजिंग लावणे कधीच विसरत नाही

प्रत्येक महिला आपल्या त्वचेची खूप काळजू घेतात. बेबो नियमितपणे तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझ वापरते. तिचे असे म्हणणे आहे की आपल्या शरीराप्रमाणे आपली त्वचा चांगली हायड्रेट करण्याची गरज असते. यासाठी मॉइश्चरायझ वापरणे फायदेशीर मानले जाते. त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चरायझरचा वापर करावा. तुम्हाला जर बेबो सारखी नितळ आणि चमकदार त्वचा हवी असेल तर मॉइश्चरायझरचा वापर करावा.

* भरपूर पाणी पिणे

नितळ त्वचेसाठी महिलांनी नियमितपणे पुरेसे पाणी प्यावे. तुम्ही करीना कपूरला जीम मधून बाहेर पडताना पहिले असेल तर तिच्या जवळ पाण्याची बाटली नेहमी जवळ असते. करीना कपूर दिवसभर पुरेसे पाणी पिते. तिच्या नितळ त्वचेमागील हे एक रहस्य आहे. तुमचे शरीर हायड्रेट असेल तेव्हाच त्वचा अधिक चमकू लागते. आता तर तुम्हाला माहिती पडले न बेबोच्या ग्लोइंग त्वचे मागील रहस्य.

* सकस आहार

तुम्ही जर तेलकट आणि सकस आहार घेत नसल तर त्वचा कशी नितळ दिसेल. करीना कपूर घरगुती आणि निरोगी आहार घेण्यावर भर देते. यात प्रथिने आणि पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.

* झोपण्यापूर्वी मेकउप काढावा

करीना कपूर झोपण्यापूर्वी मेकउप काढून झोपते. ती झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करण्यासाठी बेबी ऑइल वापरते. बहुतेक मेकउप प्रॉडक्ट केमिकल्सनी भरलेली असतात. जे आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सत्तरीच्या बंटी - बबलीचा आणखी एक पराक्रम, दोडामार्गमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली एकाला 15 लाखांचा गंडा

Goa Today's News Live: गोव्यात एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' स्वच्छता उपक्रम

Goa Drugs Case: ड्रग्स तस्करीत महिलांचा सुळसुळाट! क्राईम ब्रँचच्या छाप्यात 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिर्डी देवदर्शनावरुन परतताना झाला घात, रेल्वेनेही दिली नाही साथ; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत

Goa LDC Recruitment Scam: 'पुरावे एकत्र करण्याचे काम सुरूच'; मोन्सेरात यांच्या मागणीवर सरदेसाईंचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT