Handbrake For Vehicle Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Handbrake For Vehicle: इमर्जंसीमध्ये कारला अशा प्रकारे लावा हँडब्रेक, होणार नाही कोणतेही नुकसान

कारला इमर्जंसीमध्ये ब्रेक लावताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Handbrake For Vehicle: सर्व कारमध्ये प्रायमरी ब्रेकसह, हँडब्रेक देखील कंपनीनेच असेंबल केलेले असतात. सुरक्षितता लक्षात घेऊनच त्याचा वापर केला जातो. त्याच वेळी, जर वाहन बराच वेळ उभे असेल किंवा दुरुस्त केले गेले नसेल तर अशावेळी हँड ब्रेक वापरला जात नाही. कारण अपघाताची शक्यता वाढते. जर काही कारणास्तव तुमच्या कारला हँड ब्रेक नसेल तर तुम्हाला गाडी चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही वाहनात हँड ब्रेक खूप महत्त्वाचा असतो. हँड ब्रेक नसणे कधीकधी अपघाताचे कारण बनतात. अशावेळी तुमच्या वाहनाचा हँडब्रेक योग्य स्थितीत राहणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सक्रिय असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हँड ब्रेक वापरणे ही ड्रायव्हिंगची चांगली सवय मानली जाते. हँड ब्रेक चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

इमर्जंसी पार्किंग ब्रेक म्हणजे काय?

इमर्जंसी पार्किंग ब्रेक यालाच हँडब्रेक किंवा इमर्जन्सी ब्रेक असेही म्हणतात. हे कारचे महत्त्वाचे सुरक्षा साधन मानले जाते. पार्किंग दरम्यान कार थांबवणे हे त्याचे कार्य आहे. परंतु ते इमर्जंसीमध्ये कार थांबविण्यात देखील मदत करते. कार पार्क करताना, गियर किंवा ट्रान्समिशन बिघडले तरीही कार जागेवरच राहील. टेकड्यांवर पार्किंग करताना हे खुपउपयुक्त ठरते.

इमर्जंसीमध्ये पार्किंग ब्रेकचा वापर वाहन थांबवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. तुमच्या वाहनाचे पुढचे ब्रेक निकामी झाल्यास, तुम्ही पार्किंग ब्रेक हळू हळू लावून गाडीचा वेग कमी करू शकता. तसेच हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की पार्किंग ब्रेक तुमच्या प्रायमरी ब्रेकइतके शक्तिशाली नसतात. त्यामुळे ते कार लवकर थांबवू शकणार नाही. इमर्जंसी ब्रेक लावताना हळू हळू लावावा. जर तुम्ही ते खूप वेगाने लावल्यास चाके लॉक होऊ शकतात.

  • इमर्जंसीमध्ये वापरावा

जर प्रायमरी ब्रेक काम लागत नसेल, तर कारचा वेग कमी करण्यासाठी हँडब्रेकचा वापर करावा.

हँडब्रेक हळू हळू खेचावा. खूप जोरात खेचल्याने चाके लॉक होऊ शकतात आणि स्किड होऊ शकतात.

क्लच पॅडल दाबत रहा किंवा कार गिअरमध्ये टाकून इंजिन ब्रेकिंगचा वापरा करावा यामुळे हँडब्रेकचा प्रभाव वाढेल.

कार पूर्ण थांबेपर्यंत हँडब्रेक हळू हळू खेचत राहावा. कार थांबल्यानंतर हँडब्रेक पूर्णपणे लावा आणि इग्निशन बंद करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT