Hair Care Tips with Hibiscus  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hibiscus Benefits : केसांच्या समस्येवर जास्वंद आहे रामबाण उपाय

केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हीही एकदा घरगुती उपाय करून पहा.

दैनिक गोमन्तक

जाड, लांब आणि मजबूत केस कोणाला नको असतात? आजकालच्या जीवनशैलीत मुलं असोत की मुली, प्रत्येकजण केसांच्या समस्येने त्रस्त आहे. रसायने आणि धुळीमुळे केस निर्जीव होत आहेत. केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हीही एकदा घरगुती उपाय करून पहा.

आज आम्‍ही तुम्‍हाला जास्वंदाचे फायदे सांगणार आहोत, जे तुम्हाला कदाचितच माहीत असतील. हे असेच एक फूल आहे, जे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते. याच्या वापराने केसांची चमक परत येते, केस गळणे कमी होते आणि त्यांची ताकदही कायम राहते. ते कसे वापरायचे ते जाणून घेऊया...

जास्वंदाने केस होतील चमकदार

जर तुमच्या केसांनी चमक गमावली असेल किंवा ओलावा गमावला असेल तर तुम्ही जास्वंदाच्या फुलाने ते पुन्हा जिवंत करू शकता. यासाठी प्रथम जास्वंदाच्या पाकळ्या घेऊन त्या चांगल्या बारीक कराव्यात. नंतर ही पेस्ट एलोवेरा जेलमध्ये चांगली मिसळा. आता ते केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. सुमारे तासभर राहू द्या आणि नंतर धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने केस सुंदर आणि चमकदार होतात.

केस शॅम्पूऐवजी जास्वंदाने धुवा

जर केस गळत असतील तर तुम्ही शॅम्पू टाळा आणि जास्वंदाने केस धुवा. सर्व प्रथम जास्वंदाचे फूल वाळवून त्याची पावडर बनवा. आता या पावडरमध्ये बेसन मिसळून केसांना लावा आणि नंतर केस धुवा. असे केल्याने निर्जीव केसांना जिवंतपणा येईल आणि केस दाट आणि मजबूत होतील.

केसांमधील कोंडामुळे त्रास होत असेल तर जास्वंदाच्या फुलांचा खूप उपयोग होतो. जास्वंदाचे फूल चांगले बारीक करून त्यात मेहंदी पावडर आणि लिंबाचा रस मिसळा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि सुमारे एक तास ठेवा. त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने कोंड्याची समस्या दूर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT