Hair Wash Tips: केस मजबुत आणि घनदाट होण्यासाठी अनेक लोक केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. पण काही फायदा होत नाही. मार्केटमध्ये मिळणाऱ्या शॅम्पुमध्ये देखील केमिकल असतात. या केमिकलमुळे केस खुप खराब होतात. तुम्ही तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने देखील धुवू शकता. तुम्ही शॅम्पु एवजी कोणत्या वस्तु वापरू शकता हे जाणून घेऊया.
लिंबु
लिंबुमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते. जे केसांची घाण साफ करून केसांमधील कोंडा देखील कमी करते. यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिक्स करावे आणि केस स्वच्छ धुवावे.
सफरचंद
केस धुण्यासाठी तुम्ही सफरचंद व्हिनेगरचा वापर करू शकता. केसांच्या मुळात साचलेली घाण स्वच्छ करू शकता.
आवळा
आवळा खाणे आरोग्यासह केसांसाठी देखील फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन ए,ई आणि सी असते. यामुळे केसांना अनेक पोषक घटक मिळतात. मुळांपासून बॅक्टेरिया कमी करायचे असेल तर याचा वापर करू शकता.
कोरफड
केस स्वच्छ धुण्यासाठी तुम्ही कोरफडचा वापर करू शकता. यामध्ये केस वाढण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी अनेक गुणधर्म असतात. तसेच तेलकट केस असणाऱ्यांनी याचा वापर करू शकता.
शेककाई
केस स्वच्छ धुण्यासाठी रेठा आणि शिककाई वापरू शकता. यामध्ये अँटीफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे मृत त्वचेच्या पेशी स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.