Do 'This' Remedy For Hair Damaged By Hair Heating Tools Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care Tips: हेयर हीटिंग टूल्समुळे खराब झालेल्या केसांवर करा 'हे' उपाय

तुम्ही नैसर्गिक कंडीशनरचा (Natural conditioner) वापर करू शकता.

दैनिक गोमन्तक

Heating Setting Tools: सध्याच्या काळात प्रत्येक मुलींकडे केस सेट (Hair) करण्याचे उपकरण असतात. जसे की कर्लर्स (Curlers), हेयर ड्रायर(Hair Dryer) आणि स्ट्रेटनर (Strainer) इत्यादि अनेक उपकरणे (Equipment) असतात. याचा वापर करून आपण पाहिजे ती हेयर स्टाइल (Hairstyles) करू शकतो. परंतु उपकरणांचा सारखा वापर केल्याने आपले केस खराब होऊ शकतात. तसेच केस (Hair)गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते. तसेच केस कोरडे पडून तुटण्याची शक्यता असते. अशा वेळी केसांचे नुकसान थांबवणे फार अवघड होते. अशा वेळी काय करावे हे जाणून घेणार आहोत. यामुळे तुमच्या केसांच्या असलेल्या समस्या (Problems) दूर होऊ शकतात. तसेच केसांची (Hair Care) योग्य ती काळजी घेतल्यास केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

यामुळे अशा उपकरणांचा (Equipment) वापर केवळ लग्न समारंभ असल्यास किंवा इतर महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असला तरच करावा. अथवा रोज रोज या उपकरणाचा वापर करणे टाळावे. यामुळे तुमच्या केसांचे आरोग्या चांगले राहून केस वाढण्यास मदत मिळेल. यासाठी तुम्ही नैसर्गिक कंडीशनरचा (Natural conditioner) वापर करू शकता.

* प्रत्येकाच्या घरी दही हे असतेच. तसेच सर्वांना दह्याचे अनेक फायदे देखील माहिती आहेत.दही एक नैसर्गिक कंडीशनर आहे. तुम्ही दुसरे कोणतेही उपाय नाही केले तरी चालतील फक्त आठवड्यातून दोन वेळा केसांना दही लावा. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतील. तसेच केसांना भरपूर पोषण देखील मिळते. यामुळे केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळते.

* केसांचे आरोग्या चांगले ठेवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता. यासाठी दहीमध्ये लिंबू आणि नारळाचे तेल मिसळले तर ते हेयर पॅक चे काम करते. या हेयर पॅकला केसात 10 मिनिटे लावून ठेवावे. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यामुळे केसांचे गळणे देखील कमी होऊ शकते.

* केसांमधील कोरडेपना कमी करण्यासाठी तुम्ही घरीच तयार करू शंकटआया हेयर पॅक. हे बनवणे अतिशय सोपे आहे. हे पॅक तयार करण्यासाठी दही, केळी, कोरफड जेल, त्यात दोन चमचा मध आणि मुलतानी माती याचे चांगले मिश्रण तयार करावे. नंतर यात लिंबाचा रस टाकावा. हे मिश्रण चांगले एकजीव करावे. तयार आहे तुमचे हेयर पॅक. हे पॅक केसांमध्ये 5 ते 10 मिनिटे ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहते.

* तुमचे केस जर डैमेज असतील तर तुम्ही यासाठी प्रोटिन पॅक देखील वापरू शकता. हे पॅक तयार करण्यासाठी दही आणि अंडी वापरू शकता. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते. तसेच केसांचे आरोग्य चांगले राहते.

* केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हा सर्वात सोपा पर्याय आहे. यासाठी दही आणि मध एकत्र करावे. याचे मिश्रण केसांच्या मुळात चांगले लावावे. 5 ते 10 मिनिटे हे पॅक लाऊन ठेवावे. नंतर स्वच्छ गरम पाण्याने केस धुवावे. यामुळे केस मुलायम होतात. तसेच केसांमधील चम देखील वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT