Vastu Tips For Guru Purnima Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त करा 'हे' छोटे काम, मिळेल प्रत्येक कामात यश

हिंदू धर्मात प्रथम गुरुला दर्जा देण्यात आला असून यामुळेच गुरुपौर्णिमेला कोणते काम करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips For Guru Purnima: आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी गुरुंची पूजा करणे शुभ मानले जाते.  महर्षी वेद व्यास यांना हिंदू धर्मात प्रथम गुरुचा दर्जा देण्यात आला आहे. 

आज 3 जुलै 2023 रोजी गुरु पौर्णिमा साजरी केली जात आहे. या दिवशी गुरुंचा विशेष सन्मान केला जातो. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. 

परंतु जर तुमच्याकडे गुरू नसेल तर तुम्ही या दिवशी भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण यांना तुमचे गुरू मानून त्यांची पूजा करू शकता. पण वास्तुशास्त्रात या दिवशी कोणते काम केल्याने यश मिळेल याशाठी उपाय सांगितले आहेत.  

  • कोणते काम करावे

कामातील अडथळ्यांसाठी काय करावे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजा करताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नारळ, पिवळी फळे आणि पिवळी मिठाई अर्पण करावी. पूजेच्या साहित्यात तुळशीची पाने अवश्य ठेवावी. प्रसादांनतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती करून प्रार्थना करावी. असे वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे.

  • व्यवसायाशी संबंधित उपाय

वास्तुशास्त्रानुसार या दिवशी एक कोरा पांढरा कागद घ्यावा आणि त्यात स्वस्तिकचे प्रतीक काढावे. त्यामध्ये तुमची इच्छा लिहावी. यानंतर त्यास पिवळ्या धाग्याने बांधा आणि लॉकरमध्ये ठेवा. यानंतर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी माँ सरस्वतीची पूजा करावी. 

  • घरात सुख-शांतीसाठी उपाय

गुरुपौर्णिमेच्या दिवशी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला तुपाचा दिवा लावा. त्यात थोडी हळद घाला म्हणजे तुमच्या घरात समृद्धी कायम राहते. असे करणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते.

  • विद्यार्थ्यांसाठी उपाय

विद्यार्थांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक चिन्ह लाल रंगाने काढावे. त्यानंतर त्यावर तुमची इच्छा लिहा आणि हे पुस्तक माता सरस्वतीजवळ ठेवावे. माँ सरस्वती ही ज्ञानाची देवी आणि सर्वात मोठी गुरू मानली जाते. 

  • गुरु पौर्णिमेची पूजा कशी करावी

या दिवशी घराची स्वच्छता केल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. 

स्वच्छ ठिकाणी किंवा पूजास्थळी पांढरे कापड पसरून व्यासपीठ तयार करा आणि वेदव्यासजींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी.

यानंतर वेद व्यासजींना रोळी, चंदन, फुले, फळे आणि प्रसाद इत्यादी अर्पण करा. 

या दिवशी वेदव्यासजींबरोबरच शुक्रदेव आणि शंकराचार्य यांसारख्या गुरूंचेही आवाहन करावे. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

Claudia Konkani Film: इंडियन पॅनोरमामध्ये ‘क्लावदिया’ला स्‍थान, कोकणी चित्रपटाचा सन्‍मान; 27 रोजी होणार प्रदर्शन

SCROLL FOR NEXT