Guru Budh Gochar 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Guru Budh Gochar 2023: बुध अन् गुरूचा रेवती नक्षत्रात प्रवेश, 'या' राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

गुरू आणि बुध यांचा संयोग अत्यंत शुभ मानला जातो.

दैनिक गोमन्तक

Guru Budh Gochar 2023: बुध आणि गुरु यांचे संयोजन खूप प्रभावी आहे. जेव्हा जेव्हा बुध आणि गुरु संयोगात असतात तेव्हा खूप शुभ योग तयार होतो. कुंभ राशीसाठी हे योग फार फलदायी आहेत. 

16 मार्चपासून बुध आणि गुरू एकत्र बसले आहेत. पण 25 मार्चला बुध आणि गुरू रेवती नक्षत्रात प्रवेश करत आहेत. रेवती नक्षत्रात बुध आणि गुरूचा संयोग खूप मनोरंजक असेल.

रेवती नक्षत्राच्या चौथ्या भावात दोन्ही ग्रहांचा प्रभाव पडेल. बुध आणि गुरू हे एकमेकांचे शत्रू नाहीत. जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा ही युती खूप शुभ मानली जाते. जिथे एका बाजूला बुध बुद्धी आणि वाणी दाखवतो तर देवगुरु बृहस्पती हे ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात. 

बुध आणि गुरूचा संयोग कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात (Home) म्हणजेच संपत्तीच्या घरात असेल. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी रेवती नक्षत्रात बुध आणि बृहस्पतिचा संयोग चांगला होणार आहे.

  •  वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी अकराव्या घरात बुध आणि गुरू एकत्र येणार आहेत. यामुळे नशिबाची साथ मिळु शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील. 

आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक बाजूंसोबतच सर्जनशील कामांसाठीही हा काळ चांगला असणार आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. नवीन लोकांशी संपर्क वाढु शकतो. कौटुंबिक पाठिंबा मिळेल.

  • मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरूची जोडी चांगली राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील. तसेच प्रगती मिळेल. यासोबतच मालमत्ता खरेदीचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्याच वेळी, तुम्हाला कामाच्या ठिकाणी सन्मान मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. कामात वरिष्ठांचे कौतुक होईल. 

  • वृश्चिक

बुध आणि गुरूच्या संयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांची रचनात्मक कामांमध्ये रुची वाढेल. यावेळी धन (Money) योग होण्याची शक्यता आहे.

तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. करिअरमध्ये प्रगती होईल. सहकारी आणि परिचितांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहील.

Zodiac
  • धनु

बुध आणि गुरूच्या संयोगामुळे धनु राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नवीन मालमत्ता खरेदीसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला नोकरी (Job) बदलण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. यासह, तुम्हाला काही मोठे प्रकल्प देखील मिळू शकतात जे तुमच्या करिअरसाठी सकारात्मक परिणाम आणू शकतात. 

  • कुंभ

या राशीच्या लोकांच्या बोलण्याने लोक आकर्षित होऊ शकतात. तुम्ही तुमचे मुद्दे तर्काने इतरांसमोर मांडू शकाल, ज्यामुळे तुमचा आर्थिक फायदाही होईल. या काळात व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप फायदा होण्याचे संकेत आहेत. बुध-गुरूचा संयोग शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी देखील शुभ असणार आहे.

  • मीन

बुध आणि गुरूचा संयोग मीन राशीच्या लोकांसाठी अनेक शुभ परिणाम देईल. करिअरमध्ये कठोर परिश्रम करून यश मिळू शकते. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल. धनलाभ होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT