ग्रीन टी Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Green Tea For Brain: ग्रीन टी पिताना 'ही' काळजी घेतली तरच तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढेल

Green Tea For Brain: ग्रीन टी तुमचा मेंदू तीक्ष्ण बनवते.

दैनिक गोमन्तक

Green Tea For Brain: आपल्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर, आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरदेखील होतो. ही कार्यक्षमता चांगली राहावी यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. काही व्यायामासोबतच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीतदेखील बदल करणे महत्वाचे असते. ग्रीन टी असाच एक पदार्थ आहे, पेय आहे ज्याचा आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

ग्रीन टीचा मुख्य घटक कॅफीन आहे. हे कॅफीन कंपाऊंड अॅडेनोसिन नावाचा रासायनिक घटक स्रवण्यापासून बंद करु शकते, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. अॅडेनोसिन थांबवल्याने तुमची झोप नियंत्रित होईल, त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटण्यास मदत होते. ग्रीन टी तुमचा मेंदू तीक्ष्ण बनवते.

'या' वाईट सवयींमुळे मेंदू कमजोर होईल

काही वाईट सवयीमुळे आपला मेंदू कमजोर होऊ लागतो, मेंदूला काही वाईट झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. त्यामुळे आपण ग्रीन टी चे सेवन करत असू तर आपल्याला काही सवयी कमी करणे गरजेचे आहे. त्या सवयी कोणत्या हे जाणून घेऊयात.

1. जास्त गोड खाणे

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती जास्त गोड खाऊ लागते तेव्हा त्याची मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. यासोबतच तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्याच्या स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम होतो.

2. रागावण्याची सवय

ज्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरही रागावण्याची सवय असते, त्यांचा मेंदू हळूहळू काम करणे बंद करतो. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या नसांवर दबाव येतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात. त्यामुळे मेंदूची शक्ती कमी होऊ लागते.

3. नाश्ता वगळणे

तुम्हालाही नाश्ता वगळण्याची सवय असेल, तर तुमचा मेंदूही बिघडू शकतो. कारण असे केल्याने शरीर आणि मनाला दिवसभर आवश्यक पोषण मिळत नाही आणि थकवा जाणवतो. या सवयीमुळे मनासह शरीरही अस्वस्थ होते.

4. झोपेचा अभाव

जे लोक रोज ७ ते ८ तास झोप घेत नाहीत, त्यांचा मेंदू रिलॅक्स राहत नाही आणि थकव्यामुळे मेंदू पूर्णपणे काम करू शकत नाही. त्याचबरोबर तोंड झाकून झोपण्याच्या सवयीमुळेही शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे मेंदूच्या पेशी कमकुवत होऊ लागतात. म्हणूनच झोपण्याच्या काही तास आधी ग्रीन टी किंवा चहा-कॉफी पिऊ नये.

'या' गोष्टी मेंदूची कार्यक्षमता वाढवतो

बदाम - बेरी

अक्रोड

डार्क चॉकलेट

ब्रोकोली

डाळिंब

भोपळ्याच्या बिया

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT