Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Chandra Gochar 2025 Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रहाला मनाचा कारक आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानले जाते. चंद्राची गती ही सर्व ग्रहांमध्ये सर्वात वेगवान असते.
Chandra Gochar 2025 Horoscope
Chandra Gochar 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Chandra Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रहाला मनाचा कारक आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानले जाते. चंद्राची गती ही सर्व ग्रहांमध्ये सर्वात वेगवान असते, त्यामुळे त्याचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन मानवी जीवनावर त्वरित परिणाम घडवून आणते. आज, 25 डिसेंबर 2025 रोजी नाताळच्या मुहूर्तावर चंद्राने पुन्हा एकदा आपली चाल बदलली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चंद्र ग्रहाने कुंभ राशीत भ्रमण करत असताना 'शतभिषा' नक्षत्रात प्रवेश केला.

विशेष म्हणजे, शतभिषा नक्षत्राचा स्वामी 'राहू' हा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात राहूला भौतिक सुख-सुविधा, महत्त्वाकांक्षा आणि इच्छापूर्तीचा कारक मानले जाते. जेव्हा चंद्र राहूच्या नक्षत्रात येतो, तेव्हा काही विशिष्ट राशींच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडून येतात. चंद्राच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होणार असला तरी, मेष, कर्क आणि तूळ या तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे.

Chandra Gochar 2025 Horoscope
Horoscope: ख्रिसमसचा आनंद आणि भाग्याची मेजवानी! 'या' राशींना मिळणार स्वप्नपूर्तीची भेट, वाचा भविष्य

ओळखीचा आणि प्रगतीचा काळ

चंद्र ग्रहाच्या या परिवर्तनामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक जुन्या समस्या संपुष्टात येतील. तुमचा सामाजिक वावर वाढेल आणि समाजात तुमच्या कामाला एक नवी ओळख मिळेल. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घडून येतील. हे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करुन देतील. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ कष्टाचा असला तरी, तुमच्या मेहनतीचे फळ म्हणून तुम्हाला एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. आर्थिक आघाडीवर तुम्हाला कोणताही मोठा अडथळा येणार नाही.

Chandra Gochar 2025 Horoscope
Horoscope: आनंदाची चाहूल आणि यशाची गुढी! 'या' राशींचे भाग्य उजळणार, वाचा तुमचे भविष्य

इच्छापूर्ती आणि स्थैर्य

कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र असल्याने हे नक्षत्र परिवर्तन या राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. तुमच्या आयुष्यात एक प्रकारचे स्थैर्य येईल आणि मनाला शांतता लाभेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली तुमची एखादी खास इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ऑफिसमधील वातावरण सुखद राहील. तुम्ही तुमचे टार्गेट वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला एखादे विशेष बक्षीस किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मात्र या काळात अधिक कष्ट घ्यावे लागतील. नवीन वर्ष 2026 सुरु होण्यापूर्वी जमिनीचा एखादा व्यवहार पूर्ण करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

Chandra Gochar 2025 Horoscope
Horoscope: नशीब चमकणार! या आठवड्यात मेष, कन्या, धनू राशींवर लक्ष्मीची कृपा; 'गजकेसरी योग' ठरणार वरदान

आनंदी वार्ता आणि मानसिक शांती

तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ यशाची नवी शिखरे सर करण्याचा असेल. जे विद्यार्थी (Student) किंवा तरुण मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना या काळात मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार काम मिळेल. कौटुंबिक आघाडीवर तुम्ही तुमच्या आईसोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि मनातील अनेक प्रश्नांची उत्तरेही मिळतील. आरोग्यात सुधारणा होईल, मात्र आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला नियोजित प्रयत्न करावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com