Green Apple Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Green Apple Health Benefits : रोज हिरवे सफरचंद खाण्याची लावा सवय; यकृतासह या अवयवांना होईल फायदा

Green Apple Health Benefits : सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात शंका नाही.

दैनिक गोमन्तक

Green Apple Health Benefits : सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात शंका नाही. सफरचंद ते अनेक रंगात येतात. सहसा लाल आणि पिवळी सफरचंद खूप खाल्ली जातात; पण तुम्ही कधी हिरवे सफरचंद पाहिलंय का?

रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही, असे आपण अनेकदा ऐकले आहे. यात हिरवे सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया. (Green Apple Health Benefits)

हिरवे सफरचंद खाण्याचे फायदे

  • यकृतासाठी फायदेशीर

हिरव्या सफरचंदांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंग एजंट असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि त्याच वेळी यकृताला सुरक्षित ठेवतात. रोज हिरवे सफरचंद खाल्ल्यास यकृताचे कार्य योग्य राहते.

  • हाडे मजबूत होतील

जर आपल्याला आपले शरीर मजबूत ठेवायचे असेल तर आपल्याला आपली हाडे कोणत्याही किंमतीत मजबूत करायची गरज आहे. यासाठी आपण दररोज हिरवी सफरचंद खाणे आवश्यक आहे. 30 वर्षांनंतर हाडांची घनता कमी होऊ लागते, अशावेळी हिरवे सफरचंद खूप फायदेशीर ठरू शकते.

Green Apple Health Benefits
  • दृष्टी वाढेल

हिरवे सफरचंद हे व्हिटॅमिन ए चा समृद्ध स्त्रोत मानला जातो, जे केवळ दृष्टी सुधारत नाही तर रातांधळेपणा देखील प्रतिबंधित करते. याला 'डोळ्यांचा मित्र' म्हटले तर बहुधा चुकीचे ठरणार नाही.

  • फुफ्फुस संरक्षण

आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसांना खूप नुकसान होत आहे आणि श्वासासंबंधीचे आजारही खूप वाढले आहेत. हिरवे सफरचंद नियमितपणे खाल्ल्यास फुफ्फुसाच्या आजाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: BCCI चा मोठा निर्णय! जैसवाल, वॉशिंग्टनसह 5 जणांना झटका; दुबईला न नेण्याचा घेतला निर्णय

Mini Goa: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला

Ganesh Chaturthi: 'जयदेव.. जयदेव'! गावागावांत घुमतोय आरतीचा निनाद; भजनाचे स्‍वर अन्‌ फुगड्यांच्‍या ताल

Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

Goa Live Updates: वास्कोत अपार्टमेंटच्या २ बाल्कनी कोसळल्या

SCROLL FOR NEXT