Goan Food: clams curry
Goan Food: clams curry  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goan Food: शिंपले खा अन् रहा निरोगी

दैनिक गोमन्तक

पर्यटनाचा वारसा लाभलेला गोवा (Goa) अनेक धर्म आणि अनेक संस्कृतीचा वारसा (Cultural heritage) घेऊन पुढे जात असतो. गोव्यातील लोकांची खाद्यसंस्कृती (Food culture) आपण बघणार आहोत. गोव्यातील लोकांचे प्रमुख अन्न म्हणजे तांदुळ, मासे आणि नारळ जे इथे मुबलक प्रमाणात पिकवळल्या जाते. येथील लोकांचा मत्स्याहारावर जास्त जोर आहे. शिंपले (Mussels), कालवं, कोलंबी (सुंगटां), खेकडे (कुर्ल्या) आणि इतर विविध प्रकारचे मासे आणि भात खायला मिळाला की गोव्यातील लोकांना दुसरे काही नसले तरी चालते. (Goan Food)

साहित्य:

* बारीक चिरलेला कांदा

* बारीक चिरलेली कोथिंबीर

* काजूचे तुकडे

* आवश्यकतेनुसार शिंपले

* 2 खोबरा खिस

* बारीक चीरलेले टोमॅटो

* अदरक

* लसूण

* मॅगी मसाला

कृती:

सर्वात पहिले शिंपले (Mussels) स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात टाकून उकळावे. नंतर साध्या पाण्यात शिंपले टाकून त्यात एक चमचा मीठ टाकावे. आणि चांगले मिक्स करावे. नंतर काजू गरम पाण्यात उकळून घ्यावे. एक कढईमध्ये 3 चमचे तेल टाकावे. त्यात लसून, अदरक, कांदा, 3 ते 4 मिनिटे चांगले मिक्स करावे नंतर त्यात खोबऱ्याचा खिस टाकावे. ब्राऊन कलर येई पर्यंत चांगले शिजू द्यावे. नंतर वरुन स्वादानुसार मीठ टाकावे. नंतर मिक्सरमध्ये हे मिश्रण टाकावे नंतर अर्ध कप पाणी टाकावे. त्यात एक चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला, कोथिंबीर टाकून चांगले बारीक करून घ्यावे. नंतर एक कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूनत्यात बारीक कांदा, बारीक टोमॅटो, शिंपले आणि काजू टाकून शिजू द्यावे. नंतर यात बारीक कलेले मिश्रण टाकावे. नंतर त्यात गरम मसाला किंवा मटन मसाला टाकून चांगले मिक्स करावे. थोडा वेळ झाकण ठेवून10 ते 15 मिनिटे शिजू द्यावे. तयार आहे स्वादिष्ट मसाला शिंपले करी. ही भाजी भाता सोबत खाऊ शकता.

टीप: ही एक सुकी भाजी आहे. शिंपले घरी आणल्यावर सर्वात पहिले त्यातील माती पूर्ण निघून जाईपर्यंत चांगले धुवावे.

शिंपले खाण्याचे फायदे:

शिंपले (Mussels) तुम्ही भाजी करून किंवा मॅगीमध्ये टाकून सेवन करू शकता. शिंपले खाल्याने आरोग्य (Health) निरोगी राहते. तुम्हाला जर हाडांसंबंधीत आजार असेल तर तुम्ही शिंपल्याचे सेवन करू शकता. जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर शिंपल्याचे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT