Goa: वेरेग बेट आणि जैवसमृद्धी

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

Goa: वेरेग बेट आणि जैवसमृद्धी

पाण्यात उतरून एकदा तरी या बेटावर (Beach) जायला हवं, हे जाता-येता मनोमनी कित्येकजणांनी ठरवलंही असेल.

दैनिक गोमन्तक

वास्कोहुन (vasco) कुठठाळीला येताना, सुमारे पाच-सहा किलोमीटर अंतरावर एक इवलसं परंतु सुंदर असं बेट दिसतं. अगदी चित्रातल्यासारखं. या बेटाचे नाव आहे ‘वेरेग’. पाण्यात उतरून एकदा तरी या बेटावर (Beach) जायला हवं, हे जाता-येता मनोमनी कित्येकजणांनी ठरवलंही असेल. ओहोटी सुरु झाली की या बेटावर जायची वळणावळणाची सुंदर पायवाट उघडी होते आणि डोळ्यांसमोर आकर्षक चित्र तयार करते. काही वर्षांपूर्वी ओहोटीच्या काळात या पायवाटेला लगडून ओणव्या माणसांची लांबलचक रांग दिसायची. तिथे असलेल्या ‘तिसऱ्या’ (खायच्या शिंपल्या) काढण्यासाठी वास्को-दाभोळीहून लोकं आलेली असायची. रंगीबेरंगी पेहरावातली, दूरच्या त्या बेटापर्यंत मुंग्यासारखी पसरलेली व ओणव्या शरीराकृतींची, पाण्यातली ही रांग खुपच देखणा आकृतीबंध तयार करायची.

मात्र हल्लीच्या दिवसात इथे ‘तिसऱ्या’ मुबलक प्रमाणावर मिळणे जवळजवळ बंद झाले आहे. काही वर्षांपूर्वी जवळच असलेल्या ‘सेंट जासींतो’ बेटावर जाण्यासाठी पाईप घालून पूल बांधला गेला होता’ त्या पुलाच्या विशिष्ट रचनेमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर बंधने आली होती. कदाचित ‘तिसऱ्या’चे प्रमाण कमी होण्याचे ते एक कारण असेल असे मानून, दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या मॉविन गुदिनोनी तिथे नवीन पूल, जो पाण्याच्या प्रवाहाला अटकाव करणार नाही, बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडून मान्य करून घेतला व त्यानंतर तिथे हा दुसरा पूलही बांधला गेला. परंतु ‘तिसऱ्यां’वर आलेले गंडांतर अजून काही कमी झालेले नाही.

यावर्षी तिथे ‘तिसऱ्या’ अभावानेच दिसल्या आहेत. कधी काळी हे क्षेत्र ‘विंडोपेन ऑयस्टर’ (मदर ऑफ पर्ल्स) आणि इतर समुद्री प्रजातींचे समृद्ध प्रजनन केंद्र होते. परंतु तिथे जवळच असलेल्या अनेक शिपयार्डांमुळे निर्माण होणाऱ्या लोहखनिज, तेल आणि इतर प्रकारच्या प्रदूषणामुळे (Pollution) संरक्षित प्रजाती ‘प्लेटिना प्लेसेंटो’चा हा अधिवास आता नामशेष झाल्यातच जमा आहे.

चिखली येथील हे क्षेत्र जैवविविध वारसा स्थळ म्हणून घोषित करावे यासाठी इथल्या पंचायतीने ठराव मान्य केला आहे आणि तो मंजूर होण्यासाठी गोवा राज्य जैवविविधता मंडळाकडेही पाठवला आहे. मात्र तो गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे. जैवविविधता खात्याकडून होणाऱ्या विलंबामुळे चिखलीचे ग्रामस्थ अर्थातच नाराज आहेत. ग्रामस्थ म्हणतात, एकदा जर ही मंजुरी मिळाली तर ते देखील तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास आपला हातभार लावू शकतील.

छायाचित्रात दिसणारी ओहोटी ही वेरेग बेटाने पाहिलेली या वर्षीची पहिली ओहोटी आहे. दृश्यात सुंदरता राखली गेली आहेच पण त्या जागेत माणसे मात्र अभावानेच दिसत आहेत.

- प्रदीप नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT