World Diabetes Day 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Diabetes Day: गोड आजार ठरतोय धोकादायक; मधुमेही रुग्‍णसंख्येत गोवा पाचव्या क्रमांकावर

World Diabetes Day 2024: आरोग्‍य क्षेत्रातील केंद्रीय संस्‍था असलेल्‍या ‘आयसीएमआर’च्‍या मागच्‍या वर्षीच्‍या अहवालाप्रमाणे गोव्‍यात मधुमेही रुग्‍णांचे प्रमाण २६.४ टक्‍के असून प्री-डायबेटीक (मधुमेह होण्‍याची शक्‍यता असलेले) लोकांची संख्‍या २०.३ टक्‍के एवढी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

World Diabetes Day 2024

मडगाव: आरोग्‍य क्षेत्रातील केंद्रीय संस्‍था असलेल्‍या ‘आयसीएमआर’च्‍या मागच्‍या वर्षीच्‍या अहवालाप्रमाणे गोव्‍यात मधुमेही रुग्‍णांचे प्रमाण २६.४ टक्‍के असून प्री-डायबेटीक (मधुमेह होण्‍याची शक्‍यता असलेले) लोकांची संख्‍या २०.३ टक्‍के एवढी आहे.

जगात मधुमेही रुग्‍णांचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांच्‍या आसपास असताना गोव्‍यातील हे प्रमाण धाेकादायक असे असल्‍याचे सांगितले जाते. भारतात सर्वांत जास्‍त मधुमेही रुग्‍ण असणाऱ्या राज्‍यांमध्‍ये गोव्‍याचा क्रमांक पाचवा लागत असून तमिळनाडू, केरळ, दिल्‍ली आणि पंजाब ही राज्‍ये मधुमेहाच्‍या बाबतीत पहिल्‍या चार क्रमांकांवर आहेत.

मात्र, हे प्रमाण वस्‍तुस्‍थितीला धरून आहे का, असा सवालही गोव्‍यातील वैद्यकीय क्षेत्रातून केला जाऊ लागला आहे. हे प्रमाण निश्‍चित करताना, जो अभ्‍यास केला गेला तो योग्‍य आहे का, असा प्रश्‍न इंडियन मेडिकल असोसिएशनच्‍या गोवा शाखेचे माजी अध्‍यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी उपस्थित केला.

वास्‍तविक हा अभ्‍यास संख्‍यात्‍मक दृष्टिकोनातून करण्‍याची गरज आहे. गोव्‍यातील वेगवेगळ्‍या गावांत जाऊन अभ्‍यासासाठी नमुने गाेळा करणे आवश्‍‍यक आहे.

मात्र, आरोग्‍य खात्‍याने आयोजित केलेल्‍या शिबिरांना उपस्‍थित असलेल्‍या रुग्‍णांच्‍या आकडेवारीवर हा अभ्‍यास आधारित असून त्‍यामुळे ही आकडेवारी फसवी असण्‍याची शक्‍यता त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

डॉ. साळकर म्‍हणाले, गोव्‍यातील मधुमेही रुग्‍णांचे प्रमाण २६ टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त असण्‍याची शक्‍यता आहे. बदलती जीवनशैली आणि वाढता ताण यामुळे गोव्‍यात मधुमेहाचे रुग्‍ण झपाट्याने वाढत आहेत.

यावर नियंत्रण आणण्‍यासाठी खास धोरण आखण्‍याची गरज आहे आणि त्‍यासाठीच सखोल अभ्‍यासाची गरज आहे. दुर्दैवाने असा अभ्‍यास झालेला दिसत नाही.

ताण-तणावांचा शरीरावर होतो परिणाम!

पूर्वी गोव्‍यातील लाेकांच्‍या आहारात भरपूर भाज्‍या असायच्‍या. मात्र, त्‍याची जागा आता तळलेल्या आणि तत्‍सम पदार्थांनी घेतलेली आहे. तांदूळ हा गोव्‍यातील आहाराचा मुख्‍य घटक आहे. अतिप्रमाणात भात खाणे आणि पाव खाणे यातूनही मधुमेह वाढू शकतो.

तिसरी गोष्‍ट म्‍हणजे वाढलेला ताण-तणाव. गोव्‍यातील लोकांची जीवनशैली छानशौकीकडे वळली असल्‍याने हे जीवन जगण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो आणि हा पैसा कसा कमवण्यासाठी आता सगळेच गोवेकर प्रयत्‍न करताना दिसतात.

ही पैशांमागे चालू असलेली धाव हे मधुमेहाला आमंत्रण देणारी असून, गोव्‍यात प्री-डायबेटीक लक्षणे दिसणाऱ्या लोकांची संख्‍या २० टक्‍क्‍यांच्‍या आसपास असणे, हीसुद्धा धोक्‍याची घंटा म्‍हणावी लागेल.

अशा लोकांतील प्रत्‍येक तिसरी व्‍यक्‍ती कालांतराने मधुमेही रुग्‍ण होऊ शकतो. यासाठीच ठरावीक कालांतराने तपासणी करून वस्‍तुस्‍थितीनिष्‍ट अभ्‍यासातून एक आकडेवारी तयार करण्‍याची गरज असल्‍याचे मत डॉ. साळकर यांनी व्‍यक्‍त केले.

मधुमेहाची लक्षणे

भूक जास्त लागणे, तहान जास्त लागणे, लघवी जास्त होणे, जखम लवकर बरी न होणे, पायांमध्ये मुंग्या येणे, लघवीमध्ये जळजळ होणे, योनीमार्गाचे इन्फेक्शन होणे, थकवा वाटणे, गोड जास्त खाण्याची इच्छा होणे, ही मधुमेहाची लक्षणे आहेत.

काहीवेळा मधुमेह हा ऑपरेशनपूर्वी करावयाच्या शुगर टेस्टमुळे समजतो. मधुमेह शरीरातील एकूण एक अवयवांवर परिणाम करतो. यात प्रामुख्याने किडनी, हृदय, रेटिना, पायातील नसा, पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या या अवयवांवर जास्त परिणाम होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT