Waterfall  Dainik Gomanatak
लाइफस्टाइल

नेत्रावळीतील एकापेक्षा एक सरस धबधबे

निसर्गाने भरभरून दान दिलेल्या नेत्रावळीतले एकापेक्षा एक सरस, फेसाळते धबधबे पर्यटकांना (Tourist) साद घालू लागतात.

दैनिक गोमन्तक

पावसाळा सुरू होताच पर्यटकांचे लक्ष नेत्रावळीतील फेसाळत्या धबधब्यांकडे लागते. निसर्गाने भरभरून दान दिलेल्या नेत्रावळीतले एकापेक्षा एक सरस, फेसाळते धबधबे पर्यटकांना (Tourist) साद घालू लागतात. बारामाही वाहणारे सावरी, मैनापी, उदेंगी आणि पाली धबधबे पावसाळ्यात अधिक जोमाने ओसंडून वाहू लागतात.

नेत्रावळीतील हा सारा भागच पर्यटकांना भुरळ पडणाऱ्या इतर प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटन स्थळांची- उटी, महाबळेश्वरसारख्या ठिकाणांची आठवण करून देतो. जगातील दूरदूरच्या पर्यटकांच्या हृदयात नेत्रावळी गावाने, निसर्गाचा त्याला वरदहस्त लाभल्यामुळे आपले स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी स्थानिक, देशी आणि परदेशीं पर्यटकांची मांदियाळी नेत्रावळीचे पावसाळी दर्शन आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी या गावात दाखल होत असतात.

नेत्रावळीचा ‘सावरी धबधबा’ सर्वात अधिक पर्यटकांच्या पसंतीला उतरतो. याचे कारण म्हणजे धोका टाळण्यासाठी वनखात्याने धबधब्याच्या ठिकाणी बांधलेल्या सुमारे अडिचशे पायऱ्या. निसर्ग न्याहाळीत आपण त्या कधी पार केल्या ते कळत नाही.

नेत्रावळी गावात प्रवेश केल्यानंतर वनखात्याच्या नेत्रावळी अभयारण्य फाटकावर वनखात्याचा टॅक्स भरल्यानंतर पुढे 1 कि.मी. अंतर पार केल्यानंतर या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून पुढे गेल्यानंतर फेसाळत धो धो बरसणारा सावरी धबधबा (Waterfall) डोळ्यांचे पारणें फेडतो. पावसाळ्यात (Rain) मात्र पाण्यात उतरण्यास वन खात्याची मनाई असते. ‘सावरी’ने नेत्रावळी नाव जगाला अधिक परिचित करून दिले.

‘मैनापी’ धबधबा उंचावरून कोसळतो. पावसाळ्यात नदी पार करणे धोक्याचे असल्याने युवा वर्ग बहुधा उन्हाळ्यात (Summer) या ठिकाणी जाणे पसंत करतात. ‘उदेंगी’ धबधबा हा तुडव गावात आहे. हा धबधबा रस्त्याच्या जवळच असल्यामुळे फार चालण्याची गरज नसते.

वयस्कर लोकांना हा धबधबा पाहणे सोईचे ठरते. ‘पाली’ धबधबा केवळ केवळ साहसवीरांसाठी आहे. ट्रेकिंगसाठी देशी किंवा परदेशीं पर्यटक याच जागेची निवड करतात. हेचारही धबधबे ओसंडून वाहायला सुरुवात झाली असल्याकारणाने पर्यटकांचे या भागात आता येणेजाणे सुरू होईल. इथल्या विहंगम दृश्यांचा अनुभव डोळ्यांत भरून घेताना होणारा आनंद नक्कीच अवर्णनीय असतो.

या शिवाय वेर्ले, साळजिणी या गावात सैर करण्यासाठी गेलात तर नक्कीच उटी आणि महाबळेश्वरसारखे (Mahabaleshwar) प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते. सोबत रस्त्याच्या दुतर्फा वाहणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांचा आनंदही मनसोक्त घेता येतो.

या भागात चेरापुंजीप्रमाणेच सतत पाऊस कोसळत असतो. पावसाळ्यात हुडहुडी भरणारा पाऊस तर हिवाळ्यात (Winter) कुडकुडणारी थंडी यामुळे या भागात उन्हाळा कधी जाणवतच नाही. हिल स्टेशन म्हणून विकास केल्यास नेत्रावळीचा कायापालट होऊ शकतो.

याशिवाय चमत्कारिक बुडबुड तळी, दत्त गुंफा, बागायती अशी अनेक रम्य ठिकाणे याइथे आहेत. निसर्गमय नेत्रावळी पूर्णपणे अनुभवण्यासाठी किमान दोन दिवस तरी इथे वास्तव्य हवे. - मनोदय फडते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT