story Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोव्यात 'वर्सल' कोकणी कथासंग्रहाचे प्रकाशन

प्रकाश पर्येंकर गेली कित्येक वर्षे सातत्याने कथालेखन करत आहेत.

दैनिक गोमन्तक

प्रकाश पर्येंकर गेली कित्येक वर्षे सातत्याने कथालेखन करत आहेत. अलीकडच्या काळात एक समर्थ कोंकणी कथालेखक म्हणून त्यांचा उदय झालेला आहे. त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी त्यांच्या परिसरामधल्या त्यांना भेटलेल्या पात्रांच्या दुःख- वेदना- आनंदामध्ये वैश्विक मूल्यांच्या खुणा पाहिल्या आणि त्या खुणांचा आधार घेऊन त्या पात्रांना त्यांनी आपल्या कथांमध्ये रंगवले.

ज्ञानपीठकार साहित्यिक दामोदर मावजो म्हणतात, आज ‘कथा’ हा एक समर्थ जागतिक साहित्यप्रकार बनला आहे. कोंकणी कथेमध्ये अलीकडच्या काळात जागतिक दर्जाच्या कथेकडे तुलना करण्यासारखा सकसपणा जाणवत नाही पण ही जी पोकळी कोकणी कथेच्या विश्वात आहे. ती भरून काढण्यात काढण्याची क्षमता त्यांना प्रकाश पर्येंकर यांच्या कथेत नक्कीच जाणवते.

लेखक आणि विचारवंत उदय भेंब्रे यांच्या मते प्रकाश पर्येंकरांच्या कथांनी कोकणी कथांना एक वेगळा आयाम मिळवून दिला आहे. त्यांच्या कथेद्वारे एक वेगळे वातावरण कोकणी साहित्याला लाभले आहे. प्रकाश पर्येंकर यांच्या कथांमधली पात्रे, प्रसंग हे कोकणी साहित्यात नवे आहे. ते पुढे म्हणतात, प्रकाशच्या ज्या कथा आहेत त्या चार भिंतीत बसून लिहिणे शक्यच नाही. अशा प्रकारच्या कथा लिहिण्यासाठी गावातल्या लोकांमध्ये मिसळणे आवश्‍यक आहे. त्या लोकांच्या वास्तवातले जगणे, त्या लोकांवर घडलेला वास्तविक अन्याय कळल्याशिवाय अशा कथा लिहिणे अशक्य आहे.

प्रकाश पर्येंकर याच्या कथा जरी त्याच्या लहानशा गावात त्याला आलेल्या अनुभवातून, त्याला भेटलेल्या लोकांमधून जन्माला आलेल्या असल्या तरी त्या कथांमधून तो मांडत असलेले त्या लोकांचे जीवन इतके सर्वव्यापी आहे की त्यामुळे त्याच्या अनेक कथांचे अनुवाद हिंदी, मल्याळम, मराठी, उडिया, उर्दू, कन्नड, काश्मिरी अशा वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषेतदेखील झालेले आहे.

त्याच्या कथांमधले विश्व इतके दृश्यात्मक तीव्रतेने जाणवते की खुरीस, चंद्रकोर आणि काजरो या त्याच्या कथांवर चित्रपटही निर्माण झाले आहेत. ‘काजरो’ ह्या त्याच्या कथेवर निर्माण झालेल्या चित्रपटाला (Movie) राष्ट्रीय पुरस्कारही लाभला आहे.

डॉक्टर प्रकाश पर्येकर यांच्या कथांच्या ‘वर्सल’ या पहिल्या संग्रहाचे, गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्ले यांच्या हस्ते आज प्रकाशन होत आहे. गोवा (Goa) विद्यापीठाच्या ‘ई ब्लॉक केमेस्ट्री ऑडिटोरिअम’मध्ये हा सोहळा सकाळी 10.30 वाजता पार पडेल. जाग प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT