goa  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Travel: आकाशातून गोवा दर्शन

केवळ आकाशातून गोवा (Goa) दर्शन घडवणे इतकाच त्या हेलिकॉप्टर उड्डाणाचा हेतू होता.

दैनिक गोमन्तक

वास्को येथील एका उद्योजकाने सुमारे बारा वर्षांपूर्वी गोव्यात हेलिकॉप्टर सेवा सुरू केली होती. दक्षिण गोव्यातल्या केपे इथून ते हेलिकॉप्टर प्रवाशांना घेऊन उडायचे. गोव्याच्या आकाशात त्यांना अर्धा तास फिरवून, सुंदर गोव्याचे विहंगम दर्शन घडवून ते पुन्हा आपल्या जागी उतरायचे.

अर्ध्या तासाला साधारण पाच हजार रुपये असे त्या फेरीचे भाडे होते. केवळ आकाशातून गोवा (Goa) दर्शन घडवणे इतकाच त्या हेलिकॉप्टर उड्डाणाचा हेतू होता. हेलिकॉप्टरमधे बसून उडणे हा तेव्हा निश्चितच नव-नवलाईचा अनुभव होता.

पर्यटकांनी (Tourist) त्यावेळी ह्या सेवेचा किती फायदा घेतला हे कळले नाही पण अनेक गोमंतकीय ‘आज आपण हेलिकॉप्टरमधून फिरून आलो आहे’ याचा रुबाब त्या त्या काळात दाखवत होते.

मात्र अवघ्या एका वर्षाच्या काळात ही सेवा बंद झाली. त्यानंतर असाच एक प्रयत्न गोवा पर्यटन खात्यामार्फत केला गेला, परंतु काही स्थानिकांनी आणि तिथल्या राजकारण्याने त्याला विरोध केल्याने ही हेलिकॉप्टर सेवा उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात हलवण्यात आली. परंतु तिथे त्यांना योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती बंद पडली.

आता ‘ब्लेड इंडिया’ या खासगी संस्थेमार्फत गोव्यात हेलिकॉप्टर सेवेचे प्रयत्न पुन्हा सुरू होत आहेत. यावेळी ही सेवा केवळ ‘गोवा-दर्शन’ पुरती मर्यादित नसेल तर गोव्याचा विमानतळदेखील या सेवेला जोडला जाईल.

त्यामुळे विमानातून (Plane) गोव्यात येणाऱ्या उच्चवर्गीय प्रवाशांना उत्तर आणि दक्षिण गोव्यातल्या (South Goa) स्थळांवर अवघ्या मिनिटांत पोहोचता येईल. ‘ब्लेड’च्या संचालकांना तर विश्वास आहे की गोव्यातल्या किनारे, किल्ले, धबधबे इत्यादी सुंदर स्थळांवर पोहोचण्यासाठीदेखील यापुढे हेलिकॉप्टरचा वापर केला जाऊ शकतो. गोव्याचे पर्यटन त्यामुळे पूर्णपणे बदलेल अशी ग्वाही ते देतात.

हा पावसाळा संपत आला की ऑगस्टच्या अखेरीस ही सेवा सुरू करण्याचा संकेत ‘ब्लेड’कडून देण्यात आला आहे. सहा प्रवाशांना घेऊन उड्डाण करू शकणारी ही हेलिकॉप्टरे असतील. उत्तर गोव्यात आग्वाद किल्ल्याजवळ एक हेलिपॅड असेल तर दक्षिण गोव्यातील हेलिपॅडसाठी जागेचे संशोधन चालू आहे.

विमानतळ ते गोव्याचा अंतर्भाग, गोवा दर्शन आणि त्याचबरोबर गोवा ते मुंबई आणि गोवा ते पुणे हा प्रवासही आपल्याला हेलिकॉप्टरमधून करता येईल. मुंबईपर्यंतच्या (Mumbai) साधारण अडीच तासांच्या प्रवासात रोहा, दापोली, संगमेश्वर ह्या मार्गांवर, किनाऱ्याच्या अंगाने आकाशातून सुंदर निसर्ग न्याहाळता न्याहाळता हा प्रवास होईल.

पुण्यापर्यंतचे अंतर साधारण दोन तासांचे असेल. गोव्याच्या आकाशात हेलिकॉप्टरे विहरताना दिसायला आणि पर्यटकांनी अवघ्या मिनिटात गोव्याच्या या टोकाकडून त्या टोकाकडून पोहोचण्याचा अनुभव घ्यायला फार काळ राहिलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT