Goa| Goa Nursery
Goa| Goa Nursery Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोवा वन खात्यातर्फे कोपार्डे नर्सरीत 148 विविध वनौषधींची लागवड

दैनिक गोमन्तक

- सपना सामंत

आपले पर्यावरण सुरक्षित रहावे, आपल्याला ताजी व शुद्ध हवा मिळावी यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबर त्यांचे रक्षणसुद्धा केले पाहिजे. गोवा (Goa) सरकारच्या वन खात्यातर्फे त्यासंबंधात ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणुन वाळपई वन प्रशिक्षण खात्याच्या कोपार्डे येथील नर्सरीत वन खात्यातर्फे यंदा 148 विविध जातीच्या वनऔषधी झाडांची रोपटी तयार करून ती वितरित करण्यात येत आहेत.

कोरोना (Corona) काळानंतर आपल्या पारंपरिक घरगुती औषधांची उपयुक्तता साऱ्यांना कळली आहे. फार जुन्या काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. भारतातील (India) ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे. अपचन, हातपाय लचकणे, सूज, खरचटणे इत्यादी छोट्या तक्रारींपासून ते बाळ-बाळंतिणीची काळजी, संगोपन आदी उपचारातसुद्धा आयुर्वेदाने महत्त्व राखलेले आहे. दैनंदिन जीवनात तर किरकोळ आजारांवर औषधी (Medicine) वनस्पतींचा उपयोग नेहमीच केला जातो. वन खात्यामार्फत वनौषधी झाडांची (Tree) लागवड करताना त्यांच्या पारंपरिक औषधी उपयुक्ततेकडे लक्ष दिले गेले आहे.

वर्षभरात वनखात्यातर्फे टप्याटप्याने झाडे तयार करण्यात आली. औषधी झाडामध्ये जेष्ठमध, अश्वगंधा, शतावरी, काळे काळी मिरी, पिंपळी, हळद, आवळा, मंजिष्ठ, कडुनिंब, दारुहळद, आले, गुळवेल, एरंड, अर्जुन, कुमाठी, गुग्गुळ, कोरफड, ब्राह्मी, तुळस, सर्पगंधा, अडुळसा, इसबगोल, काडेचिराईत, ओवा, पुदिना, बावची, बेल, हिरडा, आरारूट, झेंडू, कुळीथ, हेमसागर, जव, केवडा, हादगा वृक्ष, पानफुटी, एरंड, गवती चहा (गंजन), तुळस, जास्वंदी, धुप, आवळाकडु, सुरपिण, तसेच अन्य झाडे मिळून एकंदर 148 विविध प्रकारच्या वनस्पतींची दीड लाखाच्यावर रोपटी तयार करण्यात आली. 25 हजारांपेक्षा अधिक रोपटी, या जून महिन्यापासून, वनमहोत्सवानिमित्तने शाळा, काॅलेज, संस्था, मंदिरे तसेच इतर ठिकाणी वितरितही करण्यात आली.

वाळपई वनाधिकारी, विश्वनाथ पिंगुळकर यांनी वनखात्याच्या माध्यमातून आपल्या परिसरात झाडे लावून निसर्ग हिरवागार करा असे आवाहन लोकांना केले आहे. पिंगुळकर म्हणाले, ‘गेल्या वर्षाच्या तुलनेच यंदा जास्त रोपटी तयार करण्यात आली असुन नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. एका माणसाला 5 झाडे ह्याप्रमाणे आम्ही झाडे वितरीत करत आहोत. संस्था, शाळा, काॅलेज आदीकडून रोपट्यांची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे.’ या नर्सरीतली विविध रंगबेरंगी फुलझाडे, फळझाडे तिथले वातावरण नक्कीच सुंदर करत आहेत. शाळेतील मुलेही ही नर्सरी पाहण्यासाठी खास भेट देत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT