Goa Trip
Goa Trip Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Trip: पहिल्यांदा गोव्यात जाणाऱ्यांनी 'या' 6 गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर तुमचा खिशा होऊ शकतो खाली

Puja Bonkile

गोवा हे भारतातील एक असे पर्यटन स्थळ आहे. जिथे प्रत्येकाला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जायचे असते. गोव्याचे नाव ऐकताच व्यक्तीला ताजेपणा जाणवू लागतो. तसे गोव्याला मनोरंजनाचे ठिकाण म्हटले तर वावगे ठरणार नाही. गोव्यातील संस्कृती (Goa Culture), क्लब्समधलं रंजक वातावरण आणि नाईट लाइफ (Night Life) पाहून गोव्याला पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं. जर तुम्ही अद्याप गोव्याला गेला नसाल तर अवश्य भेट द्या. जर गोव्याला जाण्याचा विचार करत असाल गोवा ट्रिपशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

योग्य वेळ निवडा

तुम्ही पहिल्यांदाच गोव्याला (Goa) भेट देत असाल तर तुम्हाला त्याबद्दल फारशी माहिती नसेल. वास्तविक, गोव्याला जाण्यासाठी योग्य वेळ निवडणे फार महत्वाचे आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत बुक करण्याचा प्रयत्न करा. गोव्याला भेट देण्याचा हा उत्तम काळ आहे. या काळात तुम्हाला अनेक आकर्षक डील मिळू शकतात. समुद्रावरील गर्दी कमी होईल आणि राहण्यासाठी जागाही सहज उपलब्ध होईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यावेळी गोव्याला जाण्याचा (Goa Trip) खर्च कमी असेल.

समुद्रकिनाऱ्यांना द्या भेट

गोव्याला प्रथमच भेट देणारे लोक अनेकदा लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांना (Goa Beach) भेट देण्यास प्राधान्य देतात. परंतु या ठिकाणी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळेल. यामुळे तुम्ही अशा समुद्रकिनाऱ्यांवर जाणे चांगले आहे, जे फारसे लोकप्रिय नाहीत. बटरफ्लाय बीच प्रमाणे, होलेंट बीच आणि गाल्गी बागा ही चांगली ठिकाणे आहेत.

जागतिक वारसा स्थळांना द्या भेट

जुने गोवा (Old Goa) हे 16व्या आणि 17व्या शतकात बांधलेल्या अनेक जागतिक वारसा स्थळांचे घर आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च येथे आवश्‍यक आहे आणि इतरही अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही अनेक प्रकारच्या वास्तुकलेचे सौंदर्य पाहू शकता.

मसाल्याच्या बागांना भेट द्या

गोवा सामान्यतः बीअर, बीच, कॅसिनो, क्लबसाठी लोकप्रिय मानला जातो. पण गोवा मसाल्यांच्या लागवडीसाठीही प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहीत आहे का? यातील काही पर्यटकांसाठी (Tourist) खुले आहेत. हे पाहिल्यानंतर, तुम्हाला गोव्याच्या पारंपारिक लंच बुफेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. सावोई स्पाइस प्लांटेशन आणि कोऑपरेटिव्ह स्पाईस प्लांटेशन हे काही आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता.

दुचाकीचा पर्याय निवडा

तुम्ही गोव्याला जाणार असाल तर चारचाकीऐवजी दुचाकीचा पर्याय निवडा. हे तुम्हाला ट्रॅफिकसारख्या समस्यांपासून वाचवेल आणि तुमचे डेस्टिनेशन सहज फिरू शकाल. गोव्यात दुचाकीवरून प्रवास करून पैशाची बचत करू शकता.

साहसी खेळांचा आनंद घ्या

साहसी खेळांचा आनंद घेतल्याशिवाय गोव्यातील तुमची सहल अपूर्ण आहे. स्कूबा डायव्हिंग, कयाकिंग, जेट स्कीइंग, विंडसर्फिंग आणि पॅरासेलिंग हे येथे अतिशय लोकप्रिय साहसी खेळ आहेत. तुम्ही पहिल्यांदाच गोव्याला जात असाल तर यापैकी एक तरी साहसी खेळांचा आनंद घ्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT