Goa| Music Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Drum Circle: तालसे चाल मिलाते चलो....

ते संगीताच्या प्रेमापोटीच ते गोव्यात (Goa) आले.

दैनिक गोमन्तक

चर्मवाद्ये मानवाच्या प्राचीन सभ्यतेशी नाते सांगणारी वाद्ये आहेत. ती प्राचीन कालापासून मनोरंजनासाठी वापरली गेलीच पण त्यांचा अधिक उपयोग रणवाद्ये म्हणूनही झाला. माणूस म्हणून उत्क्रांत होत असताना मानवी संस्कृतीचा डंका पहिल्या प्रथम ढोलसदृश चर्मवाद्यानेच वाजला असेल. आफ्रिकन आदिवासी संस्कृतीमध्ये विधींचे पार पाडताना ढोल अनिर्वाय असतो. आपल्या ‘होळी’ सारख्या सणांच्या काळात ढोल हे सर्वात महत्त्वाचे वाद्य बनते. ऋग्वेदात देखील ‘दुंदुभी’चा उल्लेख आढळतो. याचाच अर्थ आपल्या भारतवर्षात ढोल किंवा इतर चर्मवाद्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे.

भारतात (India) जसा ढोल प्रचलित आहे तसे पश्‍चिम आफ्रिकेच्या देशात ‘जेंबे’ हे वाद्य प्रचलित आहे. आज अनेक सांगितिक कार्यक्रमात ते आपल्याला भारतात देखील दिसते. आपल्या गोव्यात देखील एक असा समुदाय आहे. जो ‘जेंबे’ वादनातून एकत्रित आला आहे. ‘गोवा ड्रम सर्कल’ (Goa Drum Circle) या नावाखाली हा समुदाय दर मंगळवारी एकत्र जमून ड्रम वादनाचे धडे घेतो.

ही एक प्रकारची ‘जेंबे’ वादनाची कार्यशाळाच असते. हरमल (अरंबोल) इथे दर आठवड्याला आयोजित होणाऱ्या कार्यशाळेत ‘जेंबे’ च्या धड्याबरोबर एक नवीन वाद्यही शिकवले जाते. जर तुम्हाला एखादे वाद्य ठाऊक असेल तर ते घेऊन तुम्हीही या कार्यशाळेला जाऊ शकता आणि तिथे असलेल्या उपस्थितांना त्याचे धडे देऊ शकता. ‘शिका आणि शिकवा’ असाच तो मामला असतो.

आणि या कार्यशाळेला कुठलेही शुल्क नसते. ‘ड्रम सर्कल’ हा असा मेळावा आहे, जिथे सर्व वयोगटातील आणि स्तरातील लोक एकत्र येऊन ड्रम वादनाचा आनंद लुटतात.

‘ड्रम सर्कल’ चे जयेश जोशी सांगतात, ‘तालाद्वारे एकमेकांशी जुळवून घेणे आणि त्याचबरोबर स्वतःशीही जुळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अशा वादनातून एकतऱ्हेची ‘समुहचेतना’ निर्माण होते.’ जयेश जोशी हे मुळ ठाण्याचे.

ते संगीताच्या प्रेमापोटीच ते गोव्यात (Goa) आले. गोव्यात अनेक देशी-परदेशी संगीतकारांचा, संगीतप्रेमींचा राबता असतो. त्यांच्याकडून खुप काही शिकता येते असे ते सांगतात. ते स्वतः ‘जेंबे’ हे वाद्य वाजवतात.

जयेश पुढे सांगतात, ‘जेव्हा सारे एकत्र मिळून ड्रम वादन करतात तेव्हा एक नवीन प्रकारचा आवाज उदयाला येतो- एक सामुहिक आवाज! या सामुदायिक आवाजाने एक जादू निर्माण होते. सुर्य मावळतीला जाताना हरमलच्या किंवा मांद्रेच्या सुंदर किनाऱ्यावर(Beach), समुहात बसून आपण वादन करत आहोत ही भावनाच किती सुंदर असते.’

हा समूह मुक्त स्वरूपाचे ताल अविष्कार सादर करतो. ताल कुठला असावा हे गटाच्या त्यावेळच्या प्रेरणेवर निर्धारित होते. अंतस्फुर्ततेतून तयार झालेला हा नाद साऱ्यांनाच एका बंधनात बांधतो. आणि त्याचवेळी अनेक बंधनातून साऱ्यांना मुक्तही करतो.

या समूहात सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्कृष्ट ड्रमवादक असण्याची गरज नाही. एकत्रितपणाची भावना निर्माण करणे आणि सर्वसमावेशक ताल निर्माण करणे हेच इथले इप्सित आहे. जर तुम्ही चर्मवाद्य वाजवण्याबद्दल उत्सुक आहात हीच ती जागा आहे, जिथे तुम्ही जाऊन हे वाद्य समजावून घेऊ शकता. ड्रम सर्कलबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर ‘गोवा ड्रम सर्कल’ या त्यांच्या फेसबूक किंवा ‘Goa Drum Circle’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT