Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma Retirement: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल 2025 दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Rohit Sharma News
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Retirement: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल 2025 दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याआधी त्याने टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. रोहित सध्या केवळ वनडे क्रिकेट भारतासाठी खेळत आहे. रोहितचे सध्याचे वय 38 वर्षे आहे. त्यामुळे, आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात तो सहभागी होईल की नाही, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मात्र, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांना वाटते की, रोहित 45 वयापर्यंतही क्रिकेट खेळू शकतो.

‘45 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळण्याची क्षमता’

योगराज सिंग यांनी न्यूज 18 शी बोलताना म्हटले की, भारतीय संघाला (Team India) अजूनही रोहित शर्माची गरज आहे. त्यामुळे त्याने 45 वयापर्यंत क्रिकेट खेळत राहायला हवे. ते पुढे म्हणाले, “रोहितला दररोज सकाळी 10 किलोमीटर धावायला लावा. जर त्याची इच्छा असेल, तर त्याच्यामध्ये 45 वर्षांपर्यंत खेळण्याची क्षमता आहे. माझे वैयक्तिक मत आहे की, त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे. तुम्ही जितके जास्त देशांतर्गत क्रिकेट खेळाल, तितके जास्त फिट राहाल.”

योगराज सिंग यांनी रोहितला आवाहन करताना सांगितले, “रोहित, आम्हाला तुझी आणखी 5 वर्षे गरज आहे, त्यामुळे कृपया देशासाठी आणखी खेळत रहा, तुझ्या फिटनेसवर आणि प्रत्येक गोष्टीवर काम कर.”

Rohit Sharma News
Rohit Sharma Lamborghini Urus: 'मुंबईच्या राजा'ने खरेदी केली नवीकोरी Lamborghini, '3015' नंबर प्लेट चर्चेत; किंमत किती?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दिसणार

भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही खेळाडू सहभागी होणार आहेत. या दौऱ्यातील पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी, दुसरा 23 ऑक्टोबर रोजी, तर मालिकेतील शेवटचा सामना 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या वृत्तांनुसार, या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा करु शकतात. या दोन्ही खेळाडूंनी शेवटचा मोठा आंतरराष्ट्रीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना खेळला होता.

Rohit Sharma News
Rohit Sharma vs Virender Sehwag: एक 'सिक्सर मशीन', दुसरा 'डबल सेंच्युरी स्पेशलिस्ट' सर्वात धोकादायक ओपनर कोण? आकडेवारी देतं उत्तर

एकंदरीत, रोहित शर्माच्या क्रिकेटमधील भवितव्याबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. एकीकडे, त्याचे वय आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौरा पाहता तो लवकरच निवृत्ती घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, योगराज सिंग यांच्यासारख्या माजी खेळाडूंना वाटते की, रोहितने अजून काही वर्षे देशासाठी खेळावे. आता रोहित त्याच्या क्रिकेटच्या भवितव्याबद्दल काय निर्णय घेतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com