Goa| Goa News| Susegad Stories Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Susegad Stories: 'सुशेगाद' तून गोयंकारपणाच घेतलाय शोध

दैनिक गोमन्तक

गोमंतकीयांविषयी अनेकदा ‘सुशेगाद’ हा शब्द वापरला जातो. काय आहे हे सुशोगाद असणे? ‘सुशेगाद’ म्हणजे आळशी असणे असते का? क्लाईड डिसौझाना जेव्हा पेंग्वीन प्रकाशन या मातब्बर पुस्तक प्रकाशन संस्थेने गोव्याबद्दल लिहायची विनंती केली तेव्हा त्यांनी या साहित्यकृतीची रचना अगदी उत्साहात केली. ‘सुशोगाद-द गोवन आर्ट ऑफ कंटेनमेंट’ (सुशेगाद- समाधानाने जगण्याची गोमंतकीय कला) हे पुस्तक 2021 मध्ये ऑनलाईन लाँच केले गेले आणि ‘अमॅझोन’वर त्याला 4.5 असे रेटींग मिळाले होते आणि ते ‘बेस्ट नॉन फिक्शन ऑफ इंडिया’ ठरवले गेले.

लेखकाच्या मते ‘सुशेगाद’ असणे म्हणजे शांती आणि आनंदाचा समतोल साधणे. गोंयकारांच्या रक्तातच ती वृत्ती आहे. या पुस्तकातून गोयंकारपणाच शोध घेतला गेला आहे. लेखक स्वतः गोमंतकीय असल्याने त्याला अनेक गोमंतकीय वैशिष्ट्यांची जाणीव होती.

‘कांतार’ (गाणी), ‘दोर्या’ (समुद्र), ‘काझा’ (निवास) अशी प्रकरणे असलेल्या या पुस्तकात रेमो फर्नांडिस, डॉ. सुबाेध केरकर, कार्टुनिस्ट आलेक्सीज, गोंयचो फेस्ताकार मारियस फर्नांडिस यांच्या मुलाखती आहेत. हे पुस्तक गोमंतकीय किस्से आणि विनोदाच्या अंगाने पुढे जाते. लेखकाने त्याच्या संग्रहात असलेली फोटो आणि त्यांच्या आन्टीकडून गोळा केलेल्या पाककृतींचाही (Recipes) समावेश या पुस्तकात केला आहे. पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाचा शेवट एखाद्या कथेने होतो

गोव्यासंबंधी (Goa) अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. हे पुस्तक त्यांच्यापेक्षा वेगळे कसे यावर बोलताना क्लाईड सांगतो, ‘इतर पुस्तके फार गंभीर आणि तपशीलांनी गच्च भरलेली आहेत. माझे पुस्तक हलके-फुलके आणि वाचनासाठी अत्यंत सुलभ असे आहे.

ते गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांविषयी (Beach) नाही किंवा एखाद्या ‘चील-आऊट’ सुट्टीच्या ठिकाणाबद्दल नाही. ते गोव्याच्या अनेक सुंदर आणि महत्वाच्या पैलुंबद्दल आहे. साहित्य, वास्तुशिल्प, संगीत यांचे केंद्र म्हणून या पुस्तकात गोव्याला सादर केले गेले आहे.

हे पुस्तक (Book) अनेक पदार्थांचा समावेश असलेल्या गोमंतकीय ‘फिश थाळी’ सारखे आहे. मी सर्वात प्रथम विषयाची आणि प्रकरणांची रुपरेषा तयार केली आणि त्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी वेगवेगळ्या व्यवसांयामधल्या नामवंत लोकांची निवड केली. हे पुस्तक म्हणजे गोव्याच्या लोकांबद्दल आणि गोव्याच्या सर्व पैलूंबद्दल मला असणाऱ्या प्रेमाची खूण आहे.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT