Fruits For Glowing Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fruits: चमकदार चेहऱ्यासाठी ही फळे खा अन् त्यांची सालं चेहऱ्यावर लावा

काही फळांची सालं चेहऱ्यावर रोज लावल्याने तुमची त्वचा पटकन चमकदार, निरोगी आणि सुंदर दिसेल.

Puja Bonkile

Fruits: तुमची त्वचा नेहमी तरुण, चमकणारी आणि मुलायम राहावी असे तुम्हाला वाटते का? मग ही फळं रोज खाण्यासोबतच त्यांच्या सालीचाही समावेश चमकदार त्वचेसाठी करू शकता. अशी काही फळे आहेत जी केवळ चवीलाच अप्रतिम नाहीत तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींसाठी खूप फायदेशीर आहेत. या फळांच्या सालींमुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढू शकते. त्यांच्या सालीमध्ये असे गुणधर्म असतात जे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करतात. 

संत्री

संत्री खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर इत्यादी अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय संत्र्याची साल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेसाठी फायदा होतो. सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असते जे त्वचेसाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते. 

केळी


केळीचे फायदे सर्वांनाच माहित आहेत. पण आज जाणून घ्या त्याच्या सालीचे फायदे काय आहेत. केळी पिकल्यावर त्याची साल काढून खावी आणि साल चांगली बारीक करून घ्यावी. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर लावा. काही वेळाने ही पेस्ट सुकल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ करा आणि हलक्या हातांनी मसाज करा. असे सतत केल्याने तुमची त्वचा मऊ, कोमल आणि चमकदार राहील. केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक सारखे घटक असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते. त्यामुळे केळीच्या सालीने चेहरा आणि त्वचा या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येते. 

पपई


पपई खाणे जितके स्वादिष्ट आणि फायदेशीर आहे, तितकेच त्याचे साल त्वचेवर लावण्याचे अनेक फायदे आहेत. पपईच्या सालीमध्ये पपेन हे नैसर्गिक एन्झाइम आढळते. हे एन्झाइम त्वचेतून मृत आणि खराब झालेल्या पेशी साफ करण्यास मदत करते. हे नवीन आणि निरोगी पेशींच्या निर्मितीस देखील प्रोत्साहन देते. पपईची साल बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने डाग हळूहळू नाहीसे होतात आणि त्वचा मुलायम आणि चमकदार होते. पपईच्या सालीचा नियमित वापर केल्यास त्वचेच्या खराब समस्यांपासून सुटका मिळू शकते.

सफरचंद

 
सफरचंद हे एक स्वादिष्ट आणि निरोगी फळ आहे जे आपण जवळजवळ दररोज खातो. सफरचंदाच्या सालीमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. सफरचंदाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. हे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्यांना निरोगी ठेवतात. त्याची साल बारीक करून फेस पॅक म्हणून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होऊ लागतात. त्यामुळे त्वचा टाईट आणि टवटवीत आणि तरुण राहण्यास मदत होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

Mohammed Siraj: मिया भाईची 'मायसेल्फ' स्टोरी...! ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया; 'त्या' आठवणीने झाला भावूक VIDEO

SCROLL FOR NEXT