Girl Gang Summer trip
Girl Gang Summer trip Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Trip: मुलींनो, बिनधास्त फिरा या शहरांमध्ये जे आहेत तुमच्यासाठी सुरक्षित

दैनिक गोमन्तक

सोलो ट्रिप हा अनेकांचा छंद आहे. इतकेच नाही तर अनेक मुलींना एकट्याने किंवा मित्रांसोबत सहलीचे नियोजन करायचे असते, परंतु अनेक कारणांमुळे त्यांना पुरूष सदस्यांना न घेता कुठेतरी जाणे धोक्याचे वाटते आणि कुटुंबातील सदस्यही परवानगी देऊ इच्छित नाहीत. मुलींच्या वाढत्या असुरक्षिततेमुळे पालक मुलींना एकट्यांना सहलीला पाठवण्यास टाळाटाळ करतात. पण, भारतात अशी अनेक शहरे आहेत, ज्यांना मुलींसाठी सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे. अशा परिस्थितीत, या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला तुमच्या गर्ल गँगसोबत कुठेतरी जायचे असेल, तर तुम्ही ही शहरे फिरू शकता. (Girl Gang Summer trip)

  • भारतीय शहर, जिथे मुली मुक्तपणे फिरू शकतात

शिलाँग

मेघालय हा निसर्गाच्या दृष्टीने एक चांगला प्रदेश आहे. येथे महिलाबहुल समाज आहे, जिथे तुम्हाला सर्वत्र महिला दिसतील. कोणत्याही महिला प्रवाशाने येथे एकटीने फिरल्यास तिला कोणतीही अडचण येत नाही. शिलॉन्गच्या हिरवीगार वनराईव्यतिरिक्त, तुम्ही येथे भारतातील काही सर्वोत्तम रॉक बँडच्या कामगिरीचा आनंद घेऊ शकाल.

पॉंडीचेरी

फ्रेंच वसाहतींनी सजलेले पॉंडीचेरीचे रस्ते सर्वांना आकर्षित करतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे हे शहर महिला प्रवाशांसाठीही सुरक्षित आहे. एकाकी स्त्रीला बेफिकीरपणे हिंडताना पाहून इथल्या लोकांना आश्चर्य वाटत नाही. येथे तुम्ही बीच आणि कॅफेमध्ये फ्रेंच संस्कृतीचा आनंद घेऊ शकता.

गोवा

गोवा हे भारतातील असे ठिकाण आहे, जिथे महिलांना सुरक्षित वाटते. तुम्ही गोव्याला गेला असाल तर तुम्हालाही ही गोष्ट नक्कीच जाणवली असेल. गोव्याचे वातावरण संपूर्ण देशापेक्षा वेगळे आहे आणि तुम्ही येथे सुंदर समुद्रकिनारे, पोर्तूगीज कल्चरचा आणि नाईट पार्टीचा आनंद घेऊ शकता.

कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी, कोलकाता हे महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाते. इतकेच नाही तर जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्येही त्याची गणना होते. या शहरात रात्री उशिरापर्यंत मुली एकट्या किंवा मैत्रिणींसोबत फिरताना आणि मजा करताना दिसतील.

हैदराबाद

हैदराबाद हे देखील एक असे शहर आहे जिथे मनोरंजनासाठी अनेक गोष्टी आहेत. येथे मुलींना सुरक्षित वाटते. आयटी हब म्हणून शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झाला असून आनंदाचे शहर म्हणूनही हैदराबादची ओळख आहे. येथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जाऊन प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीचा आनंद घेऊ शकता.

मुलींसाठी सुरक्षित शहरांच्या यादीत पुण्याचे नावही आले आहे. हे शहर महाराष्ट्राची सामाजिक राजधानी म्हणून ओळखले जाते. इथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता आणि मजा करू शकता. पुण्याजवळील लवासा सिटी हे देखील पाहण्यासाठी चांगले ठिकाण आहे.

कर्नाटकमध्ये असलेले बंगळुरू शहर हे एक असे शहर आहे जे आपल्या नजरेला अट्रॅक्ट करणारे असून रोजगाराचे शहर म्हणून देखील या ठिकाणाची ओळख आहे.परंतु हे गर्दीचे आणि व्यस्त शहर मुलींसाठी सुरक्षित मानले जाते. उच्च राहणीमान आणि नाईट लाईफ येथे खूप लोकप्रिय होत आहे. या शहराच्या आजूबाजूला भेट देण्यासारखी अनेक ठिकाणेही आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT