Raksha bandhan gifts for younger brother Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2025: लहान भावाला द्या अशा भेटवस्तू, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर येईल हसू; पाहा Gift Ideas

Raksha Bandhan Gift Ideas: या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा रुढ झाली आहे

Akshata Chhatre

Best gifts for younger brother: या वर्षी रक्षाबंधन हा सण ९ ऑगस्टला साजरा होत आहे. बहीण-भावाच्या नात्यातील आनंद आणि प्रेम साजरे करण्याचा हा एक खास दिवस असतो. आता हा सण राखी बांधणे आणि मिठाई खाणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेला नाही, तर या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा रुढ झाली आहे.

आजच्या कळतील बहीण आत्मनिर्भर आणि सक्षम बनली आहे. भावाचे रक्षण करण्याची जबाबदारी केवळ भावाचीच नाही, तर बहीणही भावाची ढाल बनण्यास तत्पर असते. त्यामुळेच आजकाल बहिणीही मोठ्या उत्साहाने आपल्या भावासाठी भेटवस्तू घेतात. जर तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा लहान असेल, तर त्याला अशी भेटवस्तू द्या जी त्याच्या कायम लक्षात राहील. खासकरून लहान भावाला दिलेले गिफ्ट पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहणे हा एक वेगळाच आनंद असतो. चला तर मग, या रक्षाबंधनला लहान भावाला देण्यासाठी काही खास गिफ्ट आयडियाज पाहूया.

लहान भावासाठी खास गिफ्ट आयडियाज

१. कार्टून किंवा सुपरहीरो थीमचे गिफ्ट सेट

लहान मुलांना कार्टून आणि सुपरहीरोचे वेड असते. तुमच्या भावाला जर एखादे खास कार्टून कॅरेक्टर किंवा सुपरहीरो आवडत असेल, तर त्या थीमचा गिफ्ट सेट तुम्ही त्याला देऊ शकता. यात त्याच्या आवडीची स्कूल बॅग, पाण्याची बाटली, स्टेशनरी सेट किंवा एक खास कुशनही तुम्ही भेट देऊ शकता.

२. खेळ किंवा पझल

खेळता-खेळता शिकायला मिळाल्यास मुलांना त्याचा कंटाळा येत नाही. लहान भावासाठी तुम्ही बोर्ड गेम्स किंवा त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या क्रिएटिव्ह पझल्स देऊ शकता. असे गिफ्ट त्याच्या मनोरंजनासोबतच त्याच्या मानसिक विकासासाठीही उपयोगी ठरतील.

३. पर्सनलाइज्ड टी-शर्ट किंवा मग

तुमच्या लहान भावाचे नाव, फोटो किंवा तुमच्या दोघांचा एखादा मजेशीर मेसेज असलेला पर्सनलाइज्ड टी-शर्ट किंवा मग बनवून द्या. त्याला खास त्याच्यासाठी तयार केलेला हा गिफ्ट खूप आवडेल.

४. पुस्तके किंवा कॉमिक्सचा संग्रह

जर तुमच्या लहान भावाला वाचनाची आवड असेल, तर त्याच्या वयानुसार एखादे छानसे पुस्तक किंवा कॉमिक्सचा संग्रह त्याला नक्की भेट द्या. यामुळे त्याची वाचनाची आवड वाढेल आणि त्याचे सामान्य ज्ञानही वाढेल. तुम्ही त्याला ज्ञानवर्धक पुस्तके किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह देऊ शकता.

५. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स

आजच्या काळात मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची खूप आवड असते. रिमोट कंट्रोल असलेली कार, लहान ड्रोन, किड्स स्मार्ट वॉच किंवा हेडफोन्स यांसारखे कूल गॅझेट्स तुम्ही त्याला देऊ शकता. तुमचे बजेट पाहून तुम्ही अशा प्रकारच्या भेटवस्तूंची निवड करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 August 2025: तांत्रिक कामे किंवा इलेक्ट्रॉनिक बाबतीत दक्षता घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT