Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: अंगदुखीपासून मिळेल आराम, फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

हिवाळ्यात शरीराला फारसं ऊन मिळत नाही त्यामुळे व्हिटॅमिन 'डी' ची पातळी कमी होते त्यामुळेच हाडे आणि सांधे दुखू लागतात.

Ganeshprasad Gogate

अंगदुखीचा त्रास जवळपास सर्वच लोकांनी अनुभवाला असेल. त्यातही थंडी सुरु झाली कि या आजाराची तीव्रता वाढते. असे अनेक लोक आहेत ज्यांना सकाळी उठल्याबरोबर शरीरात वेदना होतात. चांगली झोप लागली असली तरीही नेहमी थकवा जाणवतो. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना तीव्र वेदना होतात. हिवाळ्यात शरीराला फारसं ऊन मिळत नाही किंवा कोणी ते घेत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते त्यामुळेच हाडे आणि सांधे दुखू लागतात.

व्यायाम :-

व्यायाम करणे हे अंगदुखीला काही प्रमाणात दूर करू शकत. शरीराची हालचाल झाली कि शरीरात ऊर्जा निर्माण होते. स्नायू लवचिक होतात. तुम्हाला थंडीचा जास्त त्रास असेल तर आपण जरूर व्यायाम करावा. तुम्ही नेहमी शारीरिक हालचाली करत राहा.

गरम पाण्याचा वापर :-

गरम पाण्याचा वापर आपण दैनंदिन जीवनात करू शकता. जसे कि आहारात गरम पाणी घेणे, गरम पाण्याने अंघोळ करणे, दुखणाऱ्या भागावर गरम पाण्याने शेक देणे असे उपाय तुम्ही करू शकता.

हायड्रेटेड राहा :-

वर्षभर हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. परंतु, हिवाळ्यात हे सर्वात महत्वाचे आहे. उन्हाळ्यात तुम्ही भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या.

योग्य आहार :-

वृद्ध किंवा तरुण ज्यांना सांधेदुखीचा त्रास होत असेल त्यांनी ते टाळण्यासाठी क, ड आणि के जीवनसत्त्वे असलेले अन्न खावे. हिवाळ्यात पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांसारख्या गोष्टींचा समावेश करा. त्यात कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात जे हाडे आणि सांधे यांचे आरोग्य सुधारतात.

थंड हवेच्या संपर्कात येणे टाळा :-

हिवाळ्यात, थंड हवेच्या संपर्कात आल्याने शरीरात वेदना होतात, म्हणून शक्यतो घरी राहून ते टाळण्याचा प्रयत्न करा. परंतु जर तुम्ही काही कारणांमुळे बाहेर असाल तर पूर्ण बाह्यांचे कपडे, स्वेटर घालून डोके झाकून ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT