Gardening Tips For Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Care Tips: पावसाळ्यात अशी घ्या झाडांची काळजी

Gardening Tips For Monsoon: पावसाळ्यात झाडांची खास काळजी घ्यावी लागते.

दैनिक गोमन्तक

झाडांचही आपल्यासारखंच असतं. आपण कसं वेगवेगळ्या ऋतुनुसार आपल्या आहारात, कपड्यांमध्ये, रोजच्या काही सवयींमध्ये बदल करत असतो, तसाच बदल झाडांनाही अपेक्षित असतो. उन्हाळ्यात झाडांची खास काळजी घ्यावी लागते, पावसाळ्यात वेगळी आणि हिवाळ्यातही झाडांच्या गरजेनुसार आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता उन्हाळा संपून पावसाचे आगमन झाले आहे. चला तर मग जाणुन घेऊया पावसाळ्यात झाडांची कशी काळजी घ्यावी.

* कुंड्यांमध्ये माती भरा

उन्हाळ्यात आपण कुंडीतील माती कमी करतो. जेणेकरून झाडांना जास्तीतजास्त पाणी देता येईल. पण पावसाळ्यात पाण्याची अधिक गरज नसते. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी कुंडीमध्ये माती भरून टाका. कारण जास्त पाणी साचून राहीलं तर झाडं खराब होऊ शकतात.

* कुंड्यांची छिद्रे तपासावी

काही कुंड्यांमधून पाणी अजिबातच झिरपत नाही. त्या कुंड्यांच्या खाली असणारी छिद्रे कदाचित बंद झालेली असू शकतात. त्यामुळे अशा पाणी जास्त धरून ठेवणाऱ्या कुंड्या कोणत्या आहेत ते ओळखा आणि त्यांची खालीची छिद्रे म्हणजेच ड्रेनेज होल काडी टाकून स्वच्छ करा.

* कुंंड्यांच्या प्लेट काढून टाका

कुंड्यांच्या खाली जर प्लेट ठेवत असाल, तर पावसाळ्यात त्या काढून टाका. कारण या प्लेटमध्ये प्रत्येकवेळी पाणी साचत जाईल. एवढं पाणी कायम झाडांच्या मुळाशी साचून राहणं पावसाळ्यात योग्य नाही.

* झाडांची स्वच्छता

उन्हाळ्यात अनेक झाडांची पानं सुकून जातात. काही पानं अर्धी सुकतात आणि अर्धी हिरवीच राहतात. म्हणुन पुर्णपणे सुकलेली किंवा अर्धवट सुकलेली पाने काढून टाका. कारण पावसाळ्यात अशा सुकलेल्या पानांना फंगल इन्फेक्शन होऊ शकते आणि ते संपूर्ण झाड खराब होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT