अनंत रूपे तू तुझी दाविशी... Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganpati Festival: अनंत रूपे तू तुझी दाविशी...

इथे गणपतीभोवती नजर विस्फारणारी आरास नाही, रोषणाईचा अतिरिक्त सोस नाही. जे आहे ते स्वच्छ आणि नितळ भाव-भक्तीचे प्रदर्शन.

दैनिक गोमन्तक

भुईपाल इथल्या ह्या गणपतीला रानात उगवणाऱ्या रानगवती फुलांचा मस्त वास असेल का? गोवा-वेल्हाच्या त्या गणपतीला नव्याकोऱ्या वह्यांचा वास असेल का वा कागदावर चितारलेल्या सांतइनेझच्या गणपतीला प्रिंन्टिगच्या शाईचा तर वास नसेल? हे गणपती पाहताना आपल्या गंध संवेदना वापरूनच आपल्याला ह्या गणपतींचे दर्शन घ्यावे लागेल. इथे गणपतीभोवती नजर विस्फारणारी आरास नाही, रोषणाईचा अतिरिक्त सोस नाही. जे आहे ते स्वच्छ आणि नितळ भाव-भक्तीचे प्रदर्शन.

Eco friendly decoration

सालेली सत्तरी येथील श्री. सूर्यकांत गावकर यानी यंदाही इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. नारळ, माडाच्या झावळ्यां आणि गवताची फुले (भुतो फुले) यांचा वापर करून सुमारे साडेचार फूट उंचीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली आहे. त्यासाठी त्याना 15 दिवस सतत रानावनात शोध घेत 4000 फुले जमवावी लागली. गेली पंधरा वर्षे सूर्यकांत गावकर विविध नैसर्गिक घटकांचा वापर करून देखावे साकारत असतात. अत्यंत साधी राहणीमान असलेले सूर्यकांत यांची सत्तरी तालुक्यातील एक कलाप्रेमी, निसर्गप्रेमी अशी ओळख आहे.

स्टेशनरीची सजावट

अशाच वेगळेपणाला जोपासत गोवा-वेल्हा येथील चोडणकर कुटुंबाने एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. महागड्या मखराला फाटा देत चोडणकर कुटुंबियानी यावर्षी स्टेशनरी मटेरियलपासून गणपती बाप्पाची आरास सजवली आहे. या सजावटीमध्ये वापरलेल्या वस्तू यानंतर गरजू मुलांना देता येतील असा विचार त्यामागे आहे. आपण बाप्पाच्या आरास सजावटीसाठी कित्येक हजारांचा खर्च करून वस्तू घेतो. हे पैसे एकदा वापरून खराब होणाऱ्या वस्तूंमध्ये वापरण्यापेक्षा गरजेच्या वस्तूंसाठी वापरले पाहिजेत असा विचार चोडणकर कुटुंबातील सदस्यांनी केला आणि मग तो विचार प्रत्यक्षात उतरवत त्यांनी नव्या विचारांनी बाप्पांची वेगळी आरास सजवली आहे.

कागदावरचा बाप्पा

सांतइनेझ इथल्या प्रजल साखरदांडे यांचा गणपती तर कागदावर चितारलेला असतो. त्याचा पण एक इतिहास आहे. पोर्तुगीजांच्या जाचापासून गणपतीपूजन दूर ठेवण्यासाठी कुंभारजुवे इथल्या लोकांनी कागदाचे गणपती पेटाऱ्यात लपवून त्यांची पूजा करायला आरंभ केला. डिचोली तालुक्यातल्या आमेशी गांवच्या लोकांनी देखील नंतर हीच युक्ती स्वीकारून गणपती पूजेची आपली परंपरा जपली. त्यानंतरच्या काळात लोकांनी पुन्हा मातीचे गणपती पूजायला सुरुवात केली तरी काही कुटुंबातून कागदावर चितारलेल्या गणपतीची पूजा करण्याची परंपरा चालूच राहिली. आज गोव्यात काही अवघीच कुटुंबं असतील जी कागदावर चितारलेल्या गणपतीला पूजत असतील. त्यपैकीच एक आहे, साखरदांडे कुटुंब. परंपरेप्रमाणे या ग़णपतीचे विसर्जन दीड दिवसांनी घरच्या तुळशीमध्ये केले जाते. पूजेचे स्वरूप कसलेही असले तरी ते सुरूपाने मांडणाऱ्यांच्या भाव-भक्तीला आपल्या चरणी प्रसन्नवदने रूजू करून घेणाऱ्या गजाननाला साष्टांग नमस्कार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT