Ganpati Bappa लवकर या!
Ganpati Bappa लवकर या! Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganpati Bappa लवकर या!

दैनिक गोमन्तक

तुर्थीच्या दिवसात कितीतरी अशा कौटुंबिक कहाण्यांचा शोध लागतो ज्यात धार्मिक बांधिलकीबरोबर कुटुंबातल्या आपसातल्या बांधिलकीचेही विलक्षण दर्शन घडते. मूळ डिचोली तालुक्यातल्या सुर्ल गावच्या परंतु आता पणजीतील ताळगाव भागात साधारण पन्नास- पंचावन्न वर्षांपूर्वी येऊन वसलेल्या परांजपे कुटुंबाची ही गोष्ट आहे. पन्नास वर्षांपूर्वी भिक्षुकीच्या निमित्ताने तिथे येऊन स्थायिक झालेल्या महादेव परांजपे यांचे कुटुंब आज साधारण पन्नास-साठ अशा संख्येत विस्तारले आहे. आज महादेव परांजपे या जगात नाहीत परंतु त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेच्या अनुरोधाने त्यांचे वारस गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. आपापल्या ‘न्यूक्लियर फॅमिली’ त सुखासमाधानात असणाऱ्या पतवंडाना या उत्सवाच्या निमित्ताने ‘जॉईंट फॅमिली’चा, आता हळूहळू नामशेष होत जाणाऱ्या पुरातन व्यवस्थेचा, अजूनही रंगतदार आणि जिवंत अनुभव घेता येतो हे आजच्या काळात काय कमी आहे?

महादेव परांजपे यांना सात मुले होती. सुर्ल गावात त्यांची बागायत होती. मात्र उदरनिर्वाहासाठी त्यांनी जुन्या गोव्यातल्या गोमन्तेश्वर मंदिराचे पुजारीपण स्वीकारले. पणजीच्या परिसरात ते त्यादरम्यान येऊन भिक्षुकी करायचे आणि काम आटोपले की पुन्हा जुन्या गोव्याला जायचे. सायकलवरची ही ये-जा त्यांना पुढे झेपेना म्हणून त्यांनी ताळगावला येऊन राहण्याचे ठरवले. त्यांच्या सातही मुलांचे शिक्षण पुढे पणजीतच पार पडले. उच्च शिक्षण घेऊन मुले सरकारी नोकरीत लागली. पुढे उच्च पदालाही पोहोचली.

वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलांनी घरचे सारे सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करावेत. वडिलांची ती इच्छा मुले अजूनही भक्तिभावाने पाळत आहेत. सात भावंडांच्या कुटुंबाचा विस्तार होऊन आज हे कुटुंब जवळजवळ पन्नास-साठ सदस्यांचे बनले आहे मात्र या विस्तारलेल्या कुटुंबाचा गणपती अजून ताळगाव येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी आहे. मुले नोकरीच्या निमित्ताने भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेली आहेत मात्र चतुर्थीच्या काळात त्या साऱ्यांच्या वाटा ताळगावच्या आपल्या मूळ घराच्या दिशेने वळतात.

हरितालिका पूजनाने चतुर्थीच्या आदल्या दिवसापासून त्यांच्या उत्सवाचा प्रारंभ होतो आणि पाचव्या दिवशी गणपतीचे विसर्जन होईपर्यंत ते सहा दिवस कसे सरून गेले याचा त्यांच्यापैकी कुणालाच पत्ताही लागलेला नसतो. गणपतीच्या आराधनेव्यतिरिक्त आपले सारे व्यवहार त्या सहा दिवसात हे कुटुंब विसरते. पहाटे सुरू होणारी काकड आरती, त्यानंतरचे गणेश पूजन, अथर्वशीर्षाची आवर्तने, दुपारच्या अध्यात्मिक चर्चा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळच्या भजन आरत्या अशा दिनक्रमात उत्सवातले सारे दिवस उलटून गेलेले असतात. पाचव्या दिवशी ताळगावच्या दुर्गावाडीत गणपती विसर्जनासाठी कुटुंब सदस्य निघतात तेव्हा त्यांच्या संख्येमुळे एक छोटी मिरवणूकच निघाली आहे असे वाटते. गणपतीचे विसर्जन होते आणि आपसातले अनुबंध कायम ठेवून पुढील वर्षभरासाठी हे कुटुंब पुन्हा विघटित होते. ‘गणपती बाप्पा लवकर या’ या त्यांच्या हाकेत पुढच्या वर्षी आपण सारे लवकरात लवकर एकत्रित येऊ असेच संकेत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

SCROLL FOR NEXT