Ganesh Pooja rituals Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Pooja: 'घाईत केलेली पूजाही ठरते पावन, पण...'; मनाप्रमाणे फळ मिळवण्यासाठी पुजाऱ्यांनी सांगितले रहस्य

Ganesh Pooja tips: गणेशोत्सव साजरा करताना भक्ती आणि पारंपरिक मूल्यांना महत्त्व देण्याचे आवाहन म्हापसा येथील पुजारी सोमयाजी सुहोता आपटे यांनी केले

Akshata Chhatre

म्हापसा: गणेशोत्सव साजरा करताना भक्ती आणि पारंपरिक मूल्यांना महत्त्व देण्याचे आवाहन म्हापसा येथील पुजारी सोमयाजी सुहोता आपटे यांनी केले आहे. पूजा घाईत केली असली तरी, ती मनोभावे केल्यास ती निश्चितच पावन ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणपतीचे पारंपरिक स्वरूप आणि मातीच्या मूर्तीचे महत्त्व

पुजारी आपटे यांनी गणपतीच्या रूपाविषयी बोलताना सांगितले की, गणपतीची मूर्ती त्याच्या मूळ स्वरूपातच असावी, ती शंकर, कृष्ण किंवा स्वामी समर्थ यांसारख्या अन्य देवतांच्या रूपात नसावी. तसेच, मूर्तीसाठी पीओपी (Plaster of Paris) वापरण्यास त्यांनी विरोध दर्शवला. पीओपी हा एक प्रकारचा दगड असून तो पाण्यात विरघळत नाही, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याऐवजी शुद्ध माती किंवा चिनी मातीपासून मूर्ती बनवण्याचा सल्ला त्यांनी दिला. चिनी माती सहज विरघळते आणि ती पुढील वर्षी पुन्हा वापरता येते, असेही त्यांनी नमूद केले.

पारंपरिक पूजेची पद्धत आणि आधुनिकतेचा अतिरेक

गणेशपूजेची पारंपरिक पद्धत समजावून सांगताना ते म्हणाले, मूर्तीची प्रतिष्ठापना, मंत्रोच्चार, फुले-फळे अर्पण करणे, मोदकांचा नैवेद्य, आरती, प्रसाद वाटप आणि शेवटी विसर्जन असा क्रम पाळणे आवश्यक आहे. सजावटीसाठी स्टेपलर पिन किंवा कपड्याचा मुकुट टाळायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. सध्याच्या काळात भक्तीमय वातावरणाऐवजी डीजेचा गोंधळ, फटाक्यांचा आवाज आणि प्रदूषणामुळे उत्सवाचे स्वरूप बदलत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

विसर्जनावेळी सुरक्षिततेची काळजी घ्या

अखेरीस, गणेश विसर्जनावेळी प्रत्येकाने आपली आणि इतरांची सुरक्षितता जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. फटाके फोडताना आणि पाण्यात उतरताना सर्वांनी सावधगिरी बाळगावी, असा संदेशही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: महावतार नरसिंहचा दमदार जलवा! 17 दिवसांत 213 कोटींचा टप्पा; 'छावा'च्या यादीत झाला समावेश

Comunidade Land Bill: '..अन्यथा न्यायालयात जाऊ'! कोमुनिदाद विधेयक बेकायदेशीर असल्याचा दावा; संघटनांचा विरोध

Goa Crime: तलवार-लाठ्यांनी हल्ला, नंतर गाडीवर गोळीबार; गोव्यात भल्या पहाटे तरुणांवर प्राणघातक हल्ला

Goa Live News: पासिंग-आउट परेडला मुख्यमंत्री आसाममध्ये

Goa NABARD Loan: ‘नाबार्ड’कडून गोव्याने घेतले 1368 कोटींचे कर्ज! लोकसभेत झाला खुलासा; सीतारामन यांनी केली आकडेवारी सादर

SCROLL FOR NEXT