Ganesh Festival 2021: Best tips before you welcome Bappa at your home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Festival 2021: गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

आपल्या आयुष्यातील दुख, समस्या दूर करण्यासाठी घरात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करतात.

दैनिक गोमन्तक

गणपती उत्सव (Ganpati Utsav) देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा उत्सव विशेषता: महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात साजरा केला जातो. गणपतीला विघ्नहर्ता असे सुद्धा बोलले जाते. आपल्या आयुष्यातील दुख, समस्या दूर करण्यासाठी घरात गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करतात. तर अनेक लोक गणपतीची मूर्ती भेट म्हणून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का घरात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी कोणते नियम आहेत. वास्तुशात्रानुसार जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास अशुभ मानले जाते.

* घरात या ठिकाणी मूर्ती ठेवू नये

घरात गणपतीची मूर्ती कोणत्याही कोपऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते. बेडरूममध्ये गणपतीची मूर्ती ठेवू नये.असे केल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

* नृत्य करणारी मूर्ती घरात ठेऊ नये

वास्तुशास्त्रानुसार गणपतीची नाचणारी मूर्ती घरात ठेवू नये. तसेच अशी मूर्ती कोणाला भेट म्हणून सुद्धा देवू नये. घरात गणपती बाप्पांची नृत्य करणारी मूर्ती ठेवल्यास घरात वाद निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही अशी मूर्ती कोणाला भेट म्हणून दिले तर त्यांच्या घरातसुद्धा वाद निर्माण होऊ शकतात.

* मुलीच्या लग्नात गणपतीची मूर्ती देवू नये

मुलीच्या लग्नात गणपतीची मूर्ती देणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की लक्ष्मी आणि गणेश नेहमी एकत्र असतात. जर मुलीसोबत गणेश मूर्ती दिली तर घराची समृद्धी सुद्धा बाहेर निघून जाते.

* डाव्या बाजूने सोंड असणारी मूर्ती घ्यावी

गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करतांना डाव्या बाजूने सोंड असणारी मूर्ती खरेदी करावी. जर आपण उजव्या सोंड असणार गणपतीची मूर्ती आणल्यास कडक नियम पाळणे आवश्यक असते.

* संतती प्राप्तीसाठी बाळ गणेशाची मूर्ती आणावी

वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना संततीची इच्छा असते ता लोकांनी घरात बाळ गणेशाची मूर्ती आणावी. घरातील आणि व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी शिंदूर असलेल्या गणपतीचा फोटो लावावा

* गणपतीची मूर्ती उभी नसावी

घरात गणपती बसवणार असणार तर ती मूर्ती उभी नसावी. म्हणजेच बसलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास कायमस्वरूपी लाभ मिळते. तसेच घरात सुख-शांती कायम राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT