Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2023: राशींनुसार घरात गणपती बाप्पाची करा स्थापना, लाभेल सुख-शांती

गणेशोत्सव केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Puja Bonkile

Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. कारण ते आपल्या भक्तांचे दु:ख दूर करतो. घरात सुक-समृद्धी आणतो. यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार गणपतीची मूर्ती बसवली आणि त्यानुसार अन्नदान केले तर जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तर जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी कोणती मुर्ती बसवावी.

मेष

या राशीच्या लोकांनी घरी गणपती बाप्पाची गुलाबी किंवा लाल रंगाची मूर्ती आणवी. तसेच लाडू अर्पण केल्यास कामातील अडथळे दूर होतील. घरातील दुख: दूर होतील.

वृषभ

या राशीच्या लोकांनी आपल्या घरी लाइट पिवळ्या रंगाची गणपतीची मुर्ती आणावी. बाप्पाला मोदक अर्पण करावे. यामुळे घरात आणि जीवनात सुख-समृद्धी येईल.

मिथुन

या राशीच्या लोकांनी घरात लाइट हिरव्या रंगाची गणेशाची मूर्ती स्थापन करावी. नंतर मोदक अर्पण करावे. असे केल्याने भक्ताला बुद्धी आणि शक्ती प्राप्त होईल. घरातील नकारात्मकता आणि समस्या दूर होतील.

कर्क

गणपतीची पांढऱ्या रंगाची मूर्ती स्थापन केल्यास या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. घरात सुख-शांती कायम राहील. नोकरीत प्रगती होईल.

Zodiac Signs

सिंह

या राशीच्या लोकांनी भगव्या रंगाचा गणेश मु र्आती स्थापन केल्यास त्याची प्रतिष्ठापना करावी आणि पिवळ्या बुंदीचे लाडू अर्पण करावेत. यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.

कन्या

या राशीच्या लोकांनी डार्क हिरव्या रंगाची गणेशमूर्ती स्थापन करावी. केशरी रंगाचे लाडू अर्पण करावे. यामुळे बिझनेसमध्ये अधिक फायदा मिळेल.

तूळ

घरात आकर्षक, सुंदर आणि चमकणारी मूर्ती आणावी. सुंदर सजावट करावी. मोदक आणि लाडू अर्पण करावे. यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होईल.

वृश्चिक

गणपती बाप्पाची मूर्ती लाल आणि पांढरे धोतर नेसुन असलेली मुर्ती आणावी. ज्याच्या हातात लाल कमळ आहे. त्यांना गुलाबाच्या फुलांनी सजवावे. बिझनेसमध्ये प्रगती होईल.

Ganpati Bappa morya

धनु

ज्या मूर्तीमध्ये पिवळे आणि केशरी रंग जास्त वापरले जातात. गणेशजींच्या हातात पिवळे लाडू असतात अशी मुर्ती या राशीच्या लोकांना स्थापन करावी.

मकर

डार्क रंगाची गणेशमूर्ती घरात आणावी. त्यांना रोज जास्वंदाची फुल अर्पण करावी. घरातील अडथळे दूर होतील, पैशासंबंधित समस्या दूर होतील.

कुंभ

या राशीच्या लोकांनी अशी मूर्ती आणावी ज्यामध्ये श्रीगणेश उभे आहेत आणि त्यांनी निळ्या रंगाचे धोतर परिधान केले आहे. त्यांना बेसनाचे लाडू अर्पण करावेत. घरातील अनेक समस्या दूर होतील.

मीन

या राशीच्या लोकांनी गणपतीला दररोज दुर्वा अर्पण कराव्यात. पिवळ्या रंगाची मिठाई आणि लाल रंगाचे फुले अर्पण करावे. घरातील सदस्यांवर कायम कृपा राहिल.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Viral Video: बघता-बघता फिटनेस सेंटर बनले 'आखाडा'; जिममध्ये तरुणांची तुंबळ हाणामारी, रॉडने हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT