Flavored Modak Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2022: कस्टमाइज्ड होतायेत फ्लेवर्ड मोदक, 6 ते 7 प्रकारात उपलब्ध

काळानुरूप बदल आवश्यक आहे. तब्बल दोन वर्षानंतर बाप्पाचं भक्तांनी थाटात स्वागत केलं आहे. आणि गणपतीचा सण म्हटला की, कस्टमाइजड गिफ्ट दिले जातात.

दैनिक गोमन्तक

काळानुरूप बदल आवश्यक आहे. तब्बल दोन वर्षानंतर बाप्पाचं भक्तांनी थाटात स्वागत केलं आहे. आणि गणपतीचा सण म्हटला की, कस्टमाइजड गिफ्ट दिले जातात. एवढचं काय तर, यंदा गणेश चतुर्थीनिमित्त कस्टमाइजड मोदकही तयार केले जात आहेत. गणपतीला मोदक नेहमीच आवडतात आणि या उत्सवात लोकांना खास तयार केलेले मोदक मिळतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतेक लोक घराघरात गणपती बसवतात. घरोघरी सकाळ-संध्याकाळ पूर्ण रितीरिवाजाने गणपतीची पूजा केली जाते आणि गणपती विसर्जनही उत्साहात केले जाते.

आजकाल मोदकांचे एक-दोन प्रकार नसून माखणा मोदक, बायोटीन मोदक, बेसन मोदक, नारळाचे मोदक, पान वझे मोदक, चॉकलेट मोदक, केसर नारळाचे मोदक, गुलकंद मोदक इत्यादी तयार केले जात आहेत. एवढेच नाही तर तयार मोदकांना त्रिकोणी, टोकदार, गोल आकारही दिले जात आहेत. असे सर्व मोदक कस्टमाईज करून मागणीनुसार बनवले जात आहेत.

गणेश चतुर्थीसाठी खास 9 प्रकारचे सानुकूलित मोदक तयार केले जातात. लोकांनी घरोघरी गणपती बसवला असेल, तर सकाळ-संध्याकाळच्या पूजेसाठी प्रसाद स्वरूपात मोदकांना मागणी असते. दररोज विविध प्रकारचे मोदक तयार करण्याच्या ऑर्डर्स मिळत आहेत. लोकही मिक्स मोदकांची मागणी करत आहेत. मोदकांची किंमत 1000 रुपये प्रति किलोपासून सुरू होते, जी चवीनुसार बदलते, अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guirim River Project: गिरीतील 1 हजार हेक्टर शेतीसाठी 'नदी पुनरुज्जीवन' ठरणार वरदान! मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; 46 कोटींचे काम वेगात

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांचा पेच हायकोर्टात! राज्य सरकारला द्यावा लागणार जाब; निवडणूक न घेता प्रशासक का नेमले? गोवा खंडपीठाचा रोखठोक सवाल

Horoscope 6 May 2026: बुधवारचा दिवस 4 राशींसाठी 'गोल्डन डे'! गुंतवणुकीतून मिळणार बंपर परतावा, नशिबाची लाभणार साथ; आर्थिक लाभासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT