डोकेदुखीचा त्रास असो किंवा कोणत्याही प्रकारचा ताण असेल तर थोडावेळ मसाज केल्याने लगेच कमी होतो. त्वचा (Skin) असो की केसांची काळजी घेणे असो आपण कोणतीही कसर सोडत नाही. परंतु जेव्हा पायांचा प्रश्न येतो तेव्हा आपण दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहितीय का पायाच्या तळव्यांची मसाज करणे आरोग्यदायी असते. (Foot Massage Benefits new
* पायाच्या तळव्यांची मसाज करण्याचे फायदे
* निद्रानाशाची समस्या -
जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपताना तळव्यांची मसाज करावी. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन शांत राहते.
* तणाव - चिंता दूर
एखाद्या व्यक्तीला नैराश्याची समस्या असेल तर तुम्ही पायाच्या तळव्याची मालिश केली पाहिजे. तळवे मसाज केल्याने तणाव कमी होतो.
* मासिक पाळीत उपयुक्त
महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या काळात जर महिलानी पायाची मसाज केल्यास तणाव, थकवा कमी होतो.
* रक्ताभिसरण
आयुर्वेदात रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी उत्तम मार्ग सांगितलेलं आहे. पायांचा तळव्यांची मसाज केल्याने संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे पायांची मसाज करणे आरोग्यदायी आहे.
* पायाच्या तळव्यांची कोणत्या तेलाने मसाज करावी
आयुर्वेदानुसार पायांची मसाज करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करावा. या तेलाने शरीराला मसाज केल्याने अनेक समस्या दूर होतात. पण पायांच्या तळव्याला मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल अधिक फायदेशीर ठरते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.