Proposal rejection  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ओह गॉड! अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे मुली देतात मुलांना नकार

कदाचित 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा प्रस्ताव नाकारला जाणार नाही

दैनिक गोमन्तक

प्रत्येक मुलाला कोणती ना कोणती मुलगी आवडत असते. ही मुलगी त्याची मैत्रीण असू शकते, वर्गमैत्रीण असू शकते किंवा त्याची सहकारीही असू शकते. आवडू लागल्यानंतर मुलगा तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र, बहुतांशी वेळा मुलांचे हे प्रस्ताव नाकारले जातात. मग मुले यावर विचार करू लागतात की आपला प्रस्ताव का नाकारला गेला ? वास्तविकरित्या, मुले घाईघाईत अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांचे प्रस्ताव नाकारले जातात. जाणून घ्या अशा कोणत्या सामान्य चुका आहेत ज्यांमुळे मुलांचे प्रस्ताव नाकारले जातात.

कदाचित या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा प्रस्ताव नाकारला जाणार नाही.

अति आत्मविश्वास असणे

काही मुले अतिआत्मविश्वासात असतात. मुलीला प्रपोज करण्यापूर्वी त्यांचा अतिआत्मविश्वास त्यांना बुडवतो आणि प्रस्ताव नाकारला जातो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती अतिआत्मविश्वासी बनते तेव्हा त्याच्या बोलण्याच्या शैलीपासून ते हावभावापर्यंत सर्व काही बदलते. प्रपोज करण्यापूर्वी सकारात्मक मानसिकता बाळगणे ठीक आहे, मात्र याबाबतचा अतिआत्मविश्वास त्यांना नडतो.

मुलीच्या भावनांचा विचार न करणे

काही मुले मुलीच्या भावनांचा विचार न करता प्रपोज करतात, हे त्यांचा प्रस्ताव नाकारला जाण्याचे सर्वात मोठे कारण ठरते. आता समजा तुमची नुकतीच एखाद्या मुलीशी भेट झाली असेल आणि तुम्ही तिला प्रपोज केले तर तिला तुमचा प्रपोजल नाकारण्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही. म्हणून, मुलीला नेहमी काही काळ जाणून घ्या आणि ओळख झाल्यावरच एक पाऊल पुढे टाका.

मित्रांच्या बोलण्यात येऊन प्रपोज करणे

मित्रांच्या बोलण्यात येऊन अनेक मुले प्रपोज करतात. हे मुलींना आवडत नाही. मुलींना आधी मुलाला जाणून घ्यायचे असते, ओळख वाढवत मुलाचा स्वभाव कसा आहे, त्याच्या सवई काय आहेत, हे जाणून घेण्यात रस असतो.

पुरेशी ओळख होण्यापूर्वी प्रपोज करणे

प्रेमाची सुरुवात अनेकदा मैत्रीपासून होते. आधी ते एकमेकांचे मित्र बनतात, एकमेकांना ओळखतात आणि मग कुठेतरी जाऊन समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. आता तुमची नुकतीच भेट झालेली एखादी मुलगी असेल आणि तुम्ही तिला प्रपोज केले तर तुमचा प्रपोज फेटाळला जाईल, हे मात्र नक्की.

वारंवार फोन अथवा सोशल मिडीयाचा भडिमार

वारंवार कॉल किंवा मेसेज केलेले मुलींना सहसा आवड नाहीत. जर तुम्ही तिच्याशी बोलण्यासाठी तिला वारंवार कॉल करत असाल किंवा मेसेज करत असाल तर ती तुम्हाला दर्लक्षित करण्याचा धोका वाढतो. असे केल्याने तीच्या मनात तुमची प्रतिमा खराब होईल आणि अशा स्थितीत तुमचा नकार पक्का होऊ शकतो.

भेटण्यासाठी तीच्या ईच्छेविरुद्ध आग्रह करणे

जर तुम्ही तीला बोलण्याची अथवा भेटण्याची सक्ती करत असाल तर तुमच्या नात्यात कटूता येण्याचा धोका संभवतो. कारण त्या मुलीचेही स्वतःचे वैयक्तिक आयुष्य असते आणि जर तुम्ही तिला नेहमी बोलायला किंवा भेटायला भाग पाडत असाल तर तिलाही तुमच्याशी बोलायला आवडणार नाही हे मात्र नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT