Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: पार्टनरसोबत असा करा वीकेंड खास

Relationship Tips: जोडीदारासोबत वीकेंड प्लॅन करण्याच्या सोप्या टिप्स

दैनिक गोमन्तक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ फारच कमी मिळतो. ऑफिसच्या कामामुळे त्यातील रोमान्स कमी होऊ लागतो. पण, काही छोट्या गोष्टी करून तुम्ही नात्यातील प्रेम आणि उत्साह टिकवून ठेवू शकता. आठवड्याभरात, कामाच्या गर्दीमधुन तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देऊ शकता. पार्टनरसोबत खास सुट्टी घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरून नात्यात रोमान्स आणि उत्साह वाढवू शकतात.

* बाहेर फिरायला जा

वीकेंडला जोडीदारासोबत ट्रिपला जाऊ शकता. वीकेंडला लाँग ड्राईव्ह, वॉटर पार्क किंवा जवळपासच्या कोणत्याही हिल स्टेशनवर जाऊन जोडपे एकमेकांसोबत खास वेळ घालवू शकतात. बाहेर दुपारच्या जेवणावर किंवा चित्रपट (Movie) पाहण्यासाठी, पार्कमध्ये जाऊन एकमेकांसोबत काही रोमँटिक वेळ घालउ शकता.

* एकत्र स्वयंपाक करा

तुम्हाला जर घरी सुट्टी खास बनवायची असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत घरी काहीतरी मजा करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचा स्वयंपाक (Food) घरी करू शकता. दोघांमधील प्रेम वाढेल आणि जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल.

* मनमोकळेपणाने गप्पा करा

आठवड्यातील कामामुळे तुमच्या दोघांमध्ये संवाद होऊ शकत नाही. त्यामुळे वीकेंडला (Weekend) जेव्हा जोडीदाराला सुट्टी असते तेव्हा दोघांनी संध्याकाळी बाल्कनीत किंवा टेरेसवर चहा-कॉफी घेत आल्हाददायक वातावरणात बसून मनमोकळेपणाने गप्पा केल्या पाहिजे.

* कपल पार्टी करा
तुम्ही दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी घरी डिनर किंवा डान्स पार्टी करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला हवे असल्यास, फक्त तुम्ही दोघेच सहभागी होऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या खास मित्रांनाही आमंत्रित करू शकता. येथे तुम्ही कँडल लाईट डिनर आणि रोमँटिक गाण्यावर डान्स (Dance) करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गवंडाळीत रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती

Goa Politics: खरी कुजबुज; पाचव्या मृत्यूने गूढ वाढले

Goa Literacy: अभिमानास्पद! गोवा साक्षरतेत देशात अव्वल; 99.27 टक्के नागरिक शिक्षित

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

Goa London Flight: लंडन-गोवा विमानसेवा रद्द! Air Indiaचा निर्णय; अहमदाबाद, अमृतसर सेवा होणार सुरु

SCROLL FOR NEXT