Festival Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हरित पर्यायांनी उत्सव करा साजरे

पण सजावटीसाठी वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या यापैकी अनेक गोष्टी पर्यावरण-स्नेही नाहीत हे लक्षात घ्यायची वेळ आता आली आहे.

दैनिक गोमन्तक

सण समारंभ (Festival) माणसांच्या जीवनात आनंदाचा छोटासा बगीचा निर्माण करतात. दिवस साजरा करण्यासाठी माणूस निमित्तांंच्याच शोधात असतो. धार्मिक झालीच परंतू अनेक वैयक्तिक निमित्तांनाही तो आनंदाचा मुलामा चढवतो. वाढदिवस, परिक्षेत पास होणे, नोकरीत बढती मिळणे आदी निमित्तेही त्याचा दिवस रंगीत करतात. लग्न, लग्नाचा वाढदिवस, घरी पाळणा हलणे वगैरे कारणे तर ते दिवस अधिकच बहारीने साजरा करण्याच्या संधी घेऊन येतात. आनंद साजरा करण्याचे एकदा ठरले की मग सजावट आणि मेजवानी हे आनंद साजरा करण्याच महत्वाचे भाग ठरतात. फुगे, रंगीत रिबनी, मेणबत्त्या, क्रॉकरी, कटलरी या साऱ्या गोष्टी मग तिथे आपली हजेरी लावतात. पण सजावटीसाठी वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या यापैकी अनेक गोष्टी पर्यावरण-स्नेही नाहीत हे लक्षात घ्यायची वेळ आता आली आहे.

फुगे बहुधा रबर, लेटेक्स किंवा नायलॉनचे बनलेले असतात. या सामग्रीचा घरच्या घरी पुनर्वापर करता येत नाही किंवा ते बायोडिग्रेबलही नसतात. ‘अप-सायकलर्स लॅब’ चे म्हणणे आहे. फुगे कचऱ्याच्या डब्यात, मातीत किंवा नदी किंवा समुद्रातही पोहचू शकतात. ते कुठेही पोहोचले तरी त्यांचे विघटन व्हायला वर्षानुवर्षे लागू शकतात. असा एक अंदाज आहे की पॉलियुरेथेन फुगे विघटीत व्हायला 450 वर्षे लागू शकतात. ताजी फुले, कापडी बंटींग, ओरिगामी पेपर हॅगिंग हे फुग्यांना अधिक चांगला पर्याय बनू शकतात. फुले तर रंगापलीकडे जाऊन वातावरणात सुगंध आणि तजेला निर्माण करतात. कपडा धुऊन पुन्हा वापरता येतो. ओरिगामीचा पर्याय जरी वेळखाऊ असला तरी त्यातली कलात्मकता इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकते.

फुगे

मेणबत्त्या पॅराफिन मेणापासून बनतात. पेट्रोलियम तयार होत असताना पॅराफिन उप-उत्पादनाच्या रुपाने निर्माण होते. तुम्ही वापरत असलेली मेणबत्ती ‘पॅरफिन’ ची निर्मिती असेल तर वातावरणात तुम्ही अनेक दुषित वायू उत्सर्जित करत आहात. कार्बनडाय ऑक्साइड बरोबरच बेंझिन, हायड्रोकार्बन, पॉलिॲरोमॅटिक हे हरितगृह वायू मेणबत्तीच्या ज्वलनातून तयार होतात. कागदी कंदील हे त्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतात.

मेणबत्त्या

रिबन नायलॉन किंवा पॉलिस्टरच्या बनलेल्या असतात. नायलॉनच्या वस्तू निर्मितीमुळे नायट्रस ऑक्साईड तयार होतो. हा हरितगृह वायू कार्बनडाय ऑक्साइडपेक्षा 350 पट अधिक शक्तिशाली असतो. पॉलिस्टर थंड करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो. त्यातल्या वंगणामुळे पाणी दुषितही होत असते आणि या प्रक्रियांसाठी भरपूर उर्जाही खर्च करावी लागते. कापूस किंवा बांबूपासून बनवलेल्या रिबनी या शाश्वत पर्यावरणासाठी एक चांगला पर्याय बनू शकतात.

रिबन

अनेकदा खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या प्लेटमधून वाढले जात असतात. अर्थात, त्यावर आता बंदी आहेच. काही प्लेट्‍स कागदापासून बनवून त्यावर विशिष्ट थर दिला जातो. तो प्लास्टिकचाच असतो. अर्थात कागद किंवा उसाच्या चोथ्यापासूनही प्लेट बनतात. काही लाकडाचा वापर करुनही बनतात. पण त्यांचा वापर एकदाच होऊ शकतो. त्यांच्या निर्मितीसाठी वनसंपदाच कारणी लागते आणि नैसर्गिक संसाधनांचा नाश होतो. पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारख्या स्टील, सिरॅमिक, मेलामाईन, काच लाकूड या सामग्रीचा वापर करुन तयार झालेली भांडी वापरणे हिच सर्वात चांगली कल्पना आहे. जैव प्लास्टिकचा वापर करुन तयार झालेली भांडी ही गहू तांदळाचा भुसा वापरुन तयार झालेली असतात.

क्रॉकरी

टिश्यू पेपर वापरणे हा एक आता ट्रेंड झालेला आहे. टिश्यू पेपर लाकडाचे फायबर किंवा रिसायकल केलेल्या सामग्रीपासून बनवले जातात. 15 टक्के जंगलतोडीचे (Forest) कारण टिश्यू पेपर निर्मिती हे आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे. हातरुमाल वापरण्याची जुनी सवय पुन्हा प्रचारात आणणे फार महत्वाचे आहे.

टिश्यू पेपर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT