Fenugreek Ayurvedic Medicine | Fenugreek Ayurvedic Medicine Benefits | Fenugreek Benefits  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fenugreek Ayurvedic Medicine: मेथीच्या दाण्यांमध्ये आहेत 'हे' आश्चर्यकारक फायदे

मेथीच्या दाण्यांमध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने मेथीचे दाणे अनेक रोगांपासून आराम देऊ शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Fenugreek Benefits : मेथीचे दाणे दिसायला जरी छोटे असले तरी देखील त्यामध्ये असणारे गुणधर्म फार मोठे आहेत. चवीला कडू असलेल्या या छोट्याशा मेथीच्या दाण्यामध्ये असंख्य असे आश्चर्यकारक फायदे आहेत. विशेष म्हणजे मेथीचे दाणेच नाही तर त्याच्या पानांचाही अनेक आजारांवर उपाय केला जातो. असे पाहिला गेले तर शेकडो वर्षांपासून मेथीचा अनेक आजारांवर उपाय करण्यात आला आहे.

मेथीचे गुणधर्म:-

मेथीमध्ये नियासिन, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह इत्यादी मुबलक प्रमाणात असते. यात डायोजेनिन नावाचे संयुग असते. जे सेक्स हार्मोन इस्ट्रोजेन वाढवण्याचे काम करते. यासोबत मेथी लैंगिक समस्या दूर करण्याचे काम करते. मेथीच्या बिया लैंगिक शक्ती वाढवतात. तसेच लैंगिक सहनशक्ती वाढवतात.

मेथीचे दाणे मसूर आणि भाज्यांमध्ये मसाला म्हणून वापरता येतात. वाळलेल्या मेथीचे दाणे पावडरच्या स्वरूपात बारीक करा आणि नंतर आपल्या मसाल्याच्या मिश्रणात घाला. हा मसाला कोणत्याही डिशमध्ये वापरा.

Fenugreek Ayurvedic Medicine Benefits

केसांवर कसे लावायचे:-

मूठभर मेथीचे दाणे एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी गॅसवर हे धान्य आणि पाणी उकळून घ्या. उकळल्यानंतर त्यांना थंड होऊ द्या आणि मग दाणे मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. पेस्ट आणि पाणी मिसळा आणि तयार केलेली पेस्ट लावा.

Fenugreek Hair Care Mask

हृदयाच्या आरोग्यासाठी:-

मेथीच्या दाण्यांमध्ये गॅलेक्टोमनन नावाचे तत्व असतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मेथीमध्ये पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते. जे सोडियमचे परिणाम कमी करून हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करते.

मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत:-

मेथीमुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी हे एक वरदान आहे. मेथीमध्ये विरघळणारे फायबर गॅलेक्टोमन असते. जे रक्तातील साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करतात. याकरता मेथी चांगली भाजून त्याची पावडर तयार करा. ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा घ्या. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:-

मेथीचे दाणे वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मेथी दाणे चांगले भाजून त्याची पावडर तयार करा. हे चूर्ण सकाळी कोमट पाण्यासोबत खावे. जर तुम्हाला मेथीची पावडर खाणे शक्य नसेल तर रिकाम्या पोटी भिजवलेल्या मेथीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण पोट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे पोटाची चरबी जाळली जाते. त्यामुळे वजन कमी होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT