Feng Shui Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Vastu Tips: फेंगशुईच्या या गोष्टी घरात आणतील सुख अन् धन; जाणून घ्या

फेंगशुईमध्ये सकारात्मक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी घरात ठेवल्या जाणाऱ्या पवित्र गोष्टींची सविस्तर माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Feng Shui Vastu Tips: भारतीय वास्तुशास्त्रात ज्याप्रमाणे घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी नियम व उपाय सांगितले आहेत, त्याचप्रमाणे फेंगशुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. फेंग आणि शुई म्हणजे वारा आणि पाणी.

फेंगशुईमध्ये सकारात्मक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी घरात ठेवल्या जाणाऱ्या पवित्र गोष्टींची सविस्तर माहिती दिली आहे.

फेंगशुईमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना केवळ आपल्या घरात सजावट म्हणून ठेवल्यास, आपण सकारात्मकता वाढवू शकता आणि जीवनातील समस्यांपासून मुक्त होऊ शकता. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

फिश एक्वेरियम

फेंगशुईनुसार, मासे हे नशिबाचे प्रतीक आहेत आणि घरी फिश एक्वेरियम ठेवल्याने आनंद आणि समृद्धी येते. घराच्या ड्रॉइंग फॉर्ममध्ये एक लहान फिश एक्वेरियम ठेवावा, ज्यामध्ये आठ सोनेरी मासे आणि एक काळा मासा असावा. असे मानले जाते की यामुळे नशीब खुलते आणि यशाचा मार्ग खुला होतो.

हसणारा बुद्ध

फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धा घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्याच्या हसण्यानेच घरात आनंद येऊ लागतो असं म्हणतात. लाफिंग बुद्धाच्या मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपात समान परिणाम देतात.

तुम्ही ऑफिस, घर, दुकानात लाफिंग बुद्धा लावू शकता. जर तुम्हाला लाफिंग बुद्धा घरात ठेवायचा असेल, तर त्याची मूर्ती समोरच ड्रॉईंग रूममध्ये ठेवा, जेणेकरून तुम्ही घरात प्रवेश करताच पहिल्यांदा तुम्हाला ते दिसेल.

फेंग शुई नाणे

घरातील पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी फेंगशुई नाणी खूप शुभ मानली जातात. असे मानले जाते की ही नाणी दाराच्या हँडलमध्ये लटकवल्याने घरामध्ये धन आणि सौभाग्य येते.

तीन फेंगशुई नाणी लाल रंगाच्या धाग्यात किंवा रिबनमध्ये बांधा आणि दरवाजाच्या हँडलच्या आतील बाजूस लटकवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT